युगांडा देशात अर्धनग्नावस्थेत 219 कैदी तुरुंगातून पसार

पोलिसनामा ऑनलाईन – युगांडा देशामध्ये तुरुंगातून कैदी पळून जाण्याची आगळीवेगळी घटना घडली आहे. तुरुंगामधून 219 हून अधिक कैदी अर्धनग्नावस्थेत पसार झाले. कैद्यांनी आधी तुरुंगाच्या सुरक्षा रक्षकांवर ताबा मिळवला. त्यानंतर कपड्यांवरुन कोणीही ओळखू नये म्हणून त्यांनी अंगावरील कपडे काढून पळ काढला.

लष्कराकडून लगेच अटक होईल असा विचार करुनच कैद्यांनी अर्धनग्नावस्थेत पळण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. कैद्यांनी काही शस्त्र आणि स्फोटके पळवल्याचेही सांगण्यात येत आहे. 219 कैदी पळून जाण्याचा हा सर्व प्रकार ईशान्य युगांडातील तुरुंगामध्ये घडला आहे. पळू गेलेल्या कैद्याचा सध्या शोध घेतला जात आहे. हे तुरुंग अगदी दुर्गम भागात असून कैदी जंगलामध्ये पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. हे कैदी पळून जाताना सुरक्षा रक्षक आणि त्यांच्यामध्ये गोळीबारही झाला. यामध्ये एक सुरक्षारक्षक आणि दोन कैद्यांचा मृत्यू झाला. मोरोटो जिल्ह्यातील लष्करी छावणीजवळ असणार्‍या तुरुंगामध्ये घडली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like