Coronavirus : पुणे जिल्ह्यात 2000 हुन जास्त ‘कोरोना’बाधित, एकाच दिवसात 138 नवे रुग्ण तर 7 जणांचा मृत्यु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या वाढीचा वेग रविवारीही कायम राहिला. रविवारी एकाच दिवसात १३८ कोरोना बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ५० वर पोहचली आहे. रविवारी दिवसभरात ७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्यात आतापर्यंत १११ जणांचा मृत्यु झाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर उपाययोजना केल्या जात असताना देखील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. यामध्ये पुणे शहरातील परिस्थिती अधिकच गंभीर आहे. रविवारी एका दिवसांत पुणे शहरामध्ये ९९ नवीन रूग्ण सापडले. तर पिंपरी चिंचवड मध्ये ६, कॅन्टोनमेन्ट व नगरपालिका क्षेत्रात २० आणि ग्रामीण भागात ३ नवीन रूग्णांची भर पडली आहे.

वसभरात ७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यु झाला. यामुळे आता पर्यंत मृत्यु झालेल्या रूग्णांची संख्या देखील शंभरी पार केली असून, सर्वाधिक मृत्यु देखील पुणे शहरातील आहेत. पुणे शहरात आतापर्यंत १ हजार ८१२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून पिंपरी चिंचवडमध्ये १२१, कँटोंमेंट व ग्रामीण भागात ११६ रुग्णांची संख्या झाली आहे. पुण्यात संक्रमित क्षेत्रालाच कंटेंमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून शहराच्या उर्वरित भागातील बंधने शिथिल केली आहेत.