दिवसभरात तीन कपांपेक्षा जास्त चहा पिऊ नका, ‘हे’ होतील दुष्परिणाम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – एका दिवसात तीन कपापेक्षा जास्त चहा प्यायल्याने आरोग्याला नुकसान होऊ शकते, असे यूनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. चहामध्ये असलेले कॅफीन व अन्य अनेक पोषकद्रव्ये जास्त प्रणामात घेतल्याने आरोग्याला नुकसान होऊ शकते. त्यामुळे चहा योग्य प्रमाणात पिणे आरोग्यासाठी ठिक आहे. जास्त चहा प्यायल्यास कोणते नुकसान होऊ शकते याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

चहामध्ये अ‍ॅल्युमिनियम सारखे अनेक टॉक्सिन्स असतात. यामुळे बारीक पुरळ, मुरूम यासारख्या त्वचेसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. चहामध्ये कॅफीन असते. त्यामुळे जास्त चहा प्यायल्याने अस्वस्थता वाढते. तसेच चहामध्ये असलेल्या टॅनिन, टायलिनमुळे पचन होत नाही. त्यामुळे पोटाची समस्या वाढू शकते. शिवाय, चहामध्ये फ्लोराइड अधिक प्रमाणात असते. यामुळे हाडे कमजोर होऊ शकतात.
चहामध्ये असलेल्या फायटोकेमिकल्समुळे जास्त चहा प्यायल्याने झोप न येण्याची समस्या होऊ शकते. तसेच यातील कॅफीनमुळे अ‍ॅडिक्शन होऊ शकते. असे अ‍ॅडिक्शन झाल्यास चहा न मिळाल्यावर डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा जाणवतो.

जास्त गरम चहा प्यायल्याने तोंडाला पोटापर्यंतच्या नलिकांचे नुकसान होते. यामुळे कर्करोग होऊ शकतो. ५ कपापेक्षा जास्त चहा प्यायल्याने यूरिन ४००-५०० टक्के वाढते. यामुळे किडनीवर जास्त जोर पडते आणि किडनीच्या समस्या होऊ शकते. तसेच जास्त चहा प्यायल्याने वारंवार लघवी होते. यामुळे सोडियम, पोटॅशियमसारखे शरीराला आवश्यक असणारे खनिजद्रव्ये बाहेर पडतात. अशक्तपणा वाढतो. बॉडीमधून पाणी बाहेर निघून गेल्याने डिहायड्रेशनची समस्या होण्याची शक्यता वाढते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/