‘या’ मंदिरात 30 हजार पेक्षा जास्त प्राण्यांचा दिला जाणार बळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेपाळचे गढ़ीमाई मंदिर पाच वर्षातून एकदा येणाऱ्या मेळाव्यासाठी आणि प्राण्यांचा बळी देण्यासाठी तयार झाले आहे. या मंदिरातील दोन दिवसाच्या उत्सवामध्ये म्हशींसोबत 30 हजार हुन अधिक प्राण्यांचा बळी दिला जातो. या विरोधात अनेक प्राणी संवर्धन अधिकाऱ्यांनी आवाज उठवलेला आहे. त्यासोबतच उच्च न्यायालयाने देखील यासंबंधी निर्देश दिलेले आहेत. परंतु श्रद्धेच्या नावाखाली या सर्व गोष्टींवर पडदा टाकला जातो.

काठमांडू पासून 100 किमी दूर असलेल्या बैरियापुर मध्ये असलेले गढ़ीमाई मंदिरात दर पाच वर्षांनी प्राण्यांचा सामुहिक पद्दतीने बळी दिला जातो. 2009 नंतर मात्र मंदिर संचालकांवर याबाबतचा दबाव वाढत चालला आहे. हा उत्सव शक्तीची देवी असलेल्या गढ़ीमाईच्या सन्मानार्थ आयोजित केला जातो. यामध्ये नेपाळसोबत भारतातील लाखो लोक भाग घेतात.

हजारो लोक यापूर्वीच आपल्या जनावरांसह बलिदान देण्यासाठी मंदिराच्या आवारात पोहोचले आहेत. ऑगस्ट 2016 मध्ये, नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने गढ़ीमाई मंदिर जत्रेत जनावरांचे बलिदान रोखण्यासाठी सरकारला निर्देश दिले होते. त्यास उत्तर म्हणून गढ़ीमाई पंचवार्षिक महोत्सवाच्या मुख्य समितीने म्हटले आहे की, ते कोर्टाच्या आदेशाचे पालन करेल आणि यावर्षी त्यांनी कबूतरांना न मारण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगळवारी आणि बुधवारी सामूहिक कत्तलमध्ये उंदीर, कबूतर, कोंबड्या, बदके, डुक्कर आणि म्हशींचा बळी दिला जाईल. मागील उत्सवात मंदिर मेळाव्यात हजारो प्राण्यांसह सुमारे 10,000 म्हशींचा बळी दिला होता. अशा प्रकारे, इतक्या मोठ्या संख्येने जनावरांच्या कत्तलीसाठी हे स्थान जगातील सर्वात मोठे स्थान बनले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याठिकाणी पत्रकार आणि जनतेला प्रवेश करण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी परवानगी दिली गेलेली नाही. या मंदिराचे मुख्य पुजारी मंगळ चौधरी यांनी सांगितले की, म्हशींचा बळी देण्यासाठी मंगळवार हा शुभ दिवस आहे आणि बुधवारी इतर जनावरांचा बळी दिला जाईल. प्राणी संवर्धन अॅनिमल वेलफेअर फाउंडेशनने प्राण्यांच्या बळी विरोधात एक अभियान सुरु केले आहे.

Visit : policenama.com