Coronavirus : गेल्या 24 तासात जगभरात ‘कोरोना’चे 30 हजारांहून अधिक नवे रुग्ण, 1 हजार 354 जणांचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून दिवसेंदिवस बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे अनेक देश चिंतेत आहेत. जगभरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा साधारण पावणे तीन लाखांवर पोहचला आहे. तर आतापर्यंत 11 हजार 385 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात जगभरात कोरोनाचे 30 हजारावर नवे रुग्ण आढळले आहेत.

तर 1 हजार 354 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायतक बाब म्हणजे एकट्या इटलीत गेल्या 24 तासात तब्बल 627 जणांचा बळी गेला आहे. इटलीत 2 मार्चला 52 जण ठार झाले होते, गेल्या 19 दिवसात इटलीमध्ये 3 हजार 950 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्येही मृत्यांचा आकडा एक हजारहून अधिक झाला आहे. गेल्या 24 तासात स्पेनमध्ये 262 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 13 दिवसात 1 हजार 063 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे विविध देशांमधील मृतांचा आकडा
देश मृत्यू एकूण रुग्ण
चीन 3 हजार255 81 हजार
इटली 4 हजार 32 47 हजार 21
स्पेन 1 हजार 93 21 हजार 510
इराण 1 हजार 433 19 हजार 644
फ्रान्स 450 12 हजार 612
अमेरिका 258 19 हजार640
इंग्लंड 177 3 हजार 983
दक्षिण कोरिया 102 8 हजार 799