Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरसमुळे जगभरात 48 लाखापेक्षा जास्त संक्रमित रुग्ण, 3 लाखांपेक्षा जास्त मृत्यू

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – सध्या जगभरात कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, जागतिक कोरोनो व्हायरसच्या एकूण रुग्णांची संख्या वाढून 48 लाख झाली आहे, तर विषाणूमुळे मृत्यूची संख्या 3,23,000 इतकी झाली आहे. विश्वविद्यालयाच्या सेंटर फॉर सिस्टम सायन्स अ‍ॅण्ड इंजिनियरिंगच्या (सीएसएसई) सेंटरच्या नव्या अपडेटनुसार, बुधवारी पहाटे जगभरात एकूण रुग्णांची संख्या 4,897,492 वर पोहोचली आहे, तर व्हायरसने आतापर्यंत 323,285 लोकांचा बळी घेतला आहे.

अमेरिकेत सध्या जगात कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत येथे कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 1,528,568 इतकी झाली आहे, तर त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या, 91,921 इतकी आहे. रशियामध्ये प्रकरणाची संख्या दुसर्‍या क्रमांकावर आहे. तेथे 299,941 लोकांना संसर्ग झाला असून त्यानंतर ब्राझीलमध्ये 271,885, ब्रिटनमध्ये 250,138, स्पेनमध्ये 231,606, इटलीमध्ये 232,037, फ्रान्समध्ये 180,933, जर्मनीमध्ये 177,778, तुर्की आणि इराणमध्ये 124,603 प्रकरणे नोंदली गेली आहे.

दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 35,422 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अन्य देशांनी 10,000 आकडा पार केला आहे. इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे, मृतांची संख्या 32,169 वर पोहोचली आहे, फ्रान्समध्ये 28,025, स्पेनमध्ये 27,778 आणि ब्राझीलमध्ये 16,983 लोकांचा मृत्यू झाला आहे.