Lockdown 3.0 : विशेष रेल्वे गाड्यांनी आतापर्यंत 5 लाखांहून जास्त जणांची ‘घरवापसी’ : गृह मंत्रालय

नवी दिल्‍ली – लॉकडाउन सुरू असताना रेल्वेने 468 विशेष रेल्वेगाड्या सोडल्या असुन, आतापर्यंत 5 लाखांहून अधिक नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचवले आहे. यापैकी केवळ 10 मे या दिवशी 101 गाड्या सोडण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्रालयाच्या अतिरिक्त सहसचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी सोमवारी दिली. गृह आणि आरोग्य मंत्रालयाच्या संयुक्त बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले,‘गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूची लागण झालेले 4213 रुग्ण सापडले आहेत तर 1559 रुग्ण बरे झाले आहेत. रिकव्हरी रेट आता 31.15 टक्के झाला आहे. देशात संक्रमण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 67 हजार 152 झाली आहे. चाचण्यावर आधारित धोरण आणि वेळेवर आधारित धोरण यात बदल केल्यामुळे आता रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याचा धोरणातही बदल करण्यात आला आहे.’दरम्यान, ‘आतापर्यंत 9.8 कोटी स्मार्टफोनमध्ये सेतू अप डाउनलोड करण्यात आलं असून ते वापरणाऱ्यांची माहिती सुरक्षित आहे, अशी माहिती एंपावर्ड ग्रुप 9 चे अध्यक्ष अजय सहानी यांनी दिली.