‘शेवगा’ खुपच लाभदायक, आरोग्यासह मिळतं सौंदर्य, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – शेवग्याचे झाड हे आरोग्यासाठी वरदान मानले जाते. त्याला ड्रमस्टिक देखील म्हणतात. शतकानुशतके भारतात शेवगा औषध म्हणून वापरले जात आहे. शेवगा पावडर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. शेवग्याला म्हणजे ड्रमस्टिकला सुपरफूड देखील म्हणतात. शेवगा केवळ आरोग्यासाठीच फायदेशीर नसून सौंदर्य उत्पादन म्हणूनही वापरले जाते. जाणून घेऊया काय आहेत फायदे .

व्हिटॅमिन सी, ए आणि कॅल्शियम समृद्ध – शेवग्यामध्ये सर्व आवश्यक पोषकतत्व असतात. इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायकोथेरेपी रिसर्चमध्ये असे दिसून आले आहे की शेवग्यामध्ये संत्रीपेक्षा सातपट जास्त व्हिटॅमिन सी आणि गाजरांपेक्षा १० पट जास्त व्हिटॅमिन ए आहे. इतकेच नाही तर त्यात दुधापेक्षा १७ पट जास्त कॅल्शियम आढळते आणि हिरव्या भाज्यांपेक्षा २५ पट जास्त ‘लोह’ आढळतो.

रक्तातील साखर करते नियंत्रित – फायटोकेमिकल्स शेवग्यामध्ये आढळतात, जे रक्तातील साखर कमी नियंत्रित करण्यासाठी कार्य करतात. यात एंटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत, जे पोटासाठी खूप चांगले आहेत.

अशक्तपणा (एनीमिया) ला करतो दूर – शेवग्यामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर आहे, ज्यामुळे आरोग्य तज्ञ अशक्तपणा दूर करण्यासाठी त्याच्या वापराची शिफारस करतात. शेवग्यामध्ये प्रथिने, एमिनो एसिड, फायबर, व्हिटॅमिन बी, सी आणि ई भरपूर प्रमाणात असतात.

वापरतात एक सौंदर्य उत्पादन म्हणून – शेवगा किंवा त्याचे पावडर चेहऱ्यावर जादूसारखे कार्य करते.शेवगा मुरुम काढून टाकते, त्वचा मऊ करते आणि चेचेहऱ्यावरील बारीक सुरकुत्या काढून टाकते.