Morning Drink | सकाळी चहा-कॉफीऐवजी ‘या’ ड्रिंक्सने दिवसाची सुरुवात करा, आरोग्य लाभ मिळतील

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Morning-Drink | सकाळची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. दिवसभर तजेलदार राहण्यासाठी आणि शरीर निरोगी राहण्यासाठी सकाळी केलेलं सेवन हेल्दी असावं. बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने (Tea Or Coffee) करतात, परंतु चहा किंवा कॉफीची सवय आरोग्यासाठी हानिकारक आहे. या अभ्यासानुसार सकाळी रिकाम्या पोटी चहा-कॉफी प्यायल्यास अ‍ॅसिडिटी आणि पोटाशी संबंधित अनेक आजार (Acidity And Stomach Related Problems) होऊ शकतात. त्यामुळे सकाळी चहा-कॉफी पिण्यापेक्षा ऊर्जेने परिपूर्ण अशा काही पेयांचे सेवन करावे. अशी अनेक मार्निंग ड्रिंक्स आहेत, जी सकाळी प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो. पुढे जाणून घ्या चहा-कॉफीऐवजी सकाळी कोणते पेय सेवन करावे (Morning-Drink).

 

दूध (Milk) :
सकाळी नाश्त्याला चहाऐवजी दूध पिण्याची सवय लावा. दूध अतिशय पौष्टिक मानले जाते. जीवनसत्त्व, कॅल्शियमयुक्त दुधाचे नियमित सेवन केल्याने हाडे आणि दात मजबूत होतात. सकाळी दुधाचे सेवन केल्याने दिवसभर उत्साही राहते. अशा परिस्थितीत रोज सकाळी नाश्त्याला दुधाचे सेवन करावे.

 

लिंबूपाणी (Lemonade) :
लिंबाच्या पाण्याला ऊर्जा देणारे पेय म्हणतात. उन्हाळ्यात लिंबू पाण्याचे सेवन कधीही करू शकतात. यामुळे डिहायड्रेशनची समस्या (Dehydration Problem) कमी होते, परंतु सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस प्यायल्याने शरीराला अधिक फायदा होतो. सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी कोमट केल्याने पचनसंस्था आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते. वजन वाढण्यापासून बचाव होतो आणि दिवसाची सुरुवातही चांगली होते.

 

नारळपाणी (Coconut Water) :
नारळपाणी आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. नारळाचे पाणी हे एनर्जी ड्रिंक (Energy Drink) मानले जाते. सकाळी नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने दिवसभर ऊर्जेची कमतरता भासत नाही. नारळाच्या पाण्यात चरबी आणि साखर खूप कमी प्रमाणात असते. त्यामुळे नारळाच्या पाण्याचे सेवन प्रत्येक प्रकारे आरोग्यासाठी चांगले आहे.

रस (Juice) :
सकाळी ताज्या फळांच्या (Fruits Juice) रसाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. ज्यूसमुळे शरीराला ऊर्जा मिळते, तसेच आरोग्यही बळकट होते.
तसे पाहिले तर सकाळी तुम्ही अनेक प्रकारचे ज्यूस सेवन करू शकतात.
विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस, कोरफडीचा रस, डाळिंबाचा रस आणि दुधी भोपळ्याचा ज्यूस खूप फायदेशीर मानला जातो.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Morning Drink | morning drink health benefits except tea and coffee know more

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Radish Health Benefits | जाणून घ्या पोटाचा त्रास टाळण्यासाठी मुळा खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

 

Yoga Asanas For Neck Pain Relief | मानदुखी दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात ‘ही’ आसने; जाणून घ्या

 

Skin Care Tips | उन्हाळ्यात तेलकट त्वचा होतेय?; मग ‘हे’ उपाय करा, होईल समस्या दूर