दुर्देवी ! ‘तो’ मॉर्निंग वॉक दाम्पत्याचा ठरला अखेरचा, कारची धडक बसल्यानं दोघांचा जागीच मृत्यू

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या दांपत्याचा मॉर्निंग वॉक अखेरचा ठरला आहे. मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या दांपत्याला भरधाव वेगात जाणाऱ्या कारची धडक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार शेजारच्या नाल्यात जाऊन कोसळली. पती-पत्नीच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना आज (बुधवारी) सकाळी नागपूर-चंद्रपूर मार्गावरील मजरा याठिकाणी घडली.

हरेंद्र सिंह (वय- 58) आणि मिरा सिंह (वय-52) असे मृत्यू झालेल्या दांपत्याची नावं आहेत. हरेंद्र सिंह हे व्होल्टास कंपनीचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. मजरा येथील रहिवासी असलेल्या दोघांचा मृतदेह वरोरा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आज सकाळी सिंह दांपत्या नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले होते. वरोरा शहरालगत पोहोचले असता भरधाव वेगात येणाऱ्या टाटा गाडीने दोघांना जोरात धडक दिली. कार भरधाव वेगात असल्याने सिंह दाम्पत्याला धडक दिल्यानंतर कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात जाऊन उलटली. या अपघातात सिंह दांम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.

धक्कादायक बाब म्हणजे, अपघातानंतर सिंह दाम्पत्य जखमी अवस्थेत रस्त्यावर विव्हळत होते. तेव्हा चालकाने मदत करण्याचे सोडून घटनास्थळावरून पलायन केले. सकाळच्या वेळी रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्याने त्यांना वेळीच उपचार मिळू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. या घटनेतील वाहन चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like