पाकिस्तानने केली बॅन, परंतु ‘या’ इस्लामिक देशांमध्ये आज सुद्धा लग्नासाठी व्हिर्जिनिटी टेस्ट आवश्यक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकतेच पाकिस्तानच्या न्यायालयाने बलात्कार पीडितांची व्हर्जिनिटी टेस्ट (कौमार्य चाचणी) बंद करण्याचा निर्णय सुनावला आहे. पंजाब प्रांतात लाहोर हायकोर्टच्या जज आयशा मलिक यांनी म्हटले होते की, ही टेस्ट आपमानास्पद आहे आणि यातून कोणतीही फॉरेन्सिक मदत मिळत नाही. या निर्णयानंतर हायमन चेक करने आणि टू-फिंगर टेस्ट करण्याची प्रक्रिया बंद करण्यात येईल.

मात्र, आजसुद्धा अनेक देश असे आहेत जिथे महिलांना सेक्शुयलिटी आणि व्हर्जिनिटीबाबत कठोर कायदे आहेत. या देशांच्या यादीत मोरक्कोच्या नावाचा सुद्धा समावेश आहे. मोरक्कोच्या पीनल कोडच्या हिशेबाने विवाहबाह्य सेक्स बेकायदेशीर आहे आणि येथे विवाहाच्या अगोदर महिलांना व्हर्जिनिटी टेस्ट करावी लागते आणि या टेस्टमध्ये पास न झाल्यास पुरूष लग्न रद्ददेखील करू शकतात.

2018 मध्ये जागतिक आरोग्य संघटना, ह्यूमन राईट्स कौन्सिल आणि युनायटेड नेशन्स वुमेनने या सर्टीफिकेट्सवर प्रतिबंध लावण्याची मागणी केली होती, कारण हे सर्टीफिकेट्स महिलांच्या विरूद्ध लैंगिक भेदभाव आणि पितृसत्तात्मक व्यवस्थेला प्रोत्साहन देते आणि यातून महिलांच्याविरूद्धा हिंसा सुद्धा वाढत असलेल्याचे दिसून आले आहे.

मोरक्कोचे अनेक सोशियोलॉजिस्ट्स, सायकोलॉजिस्ट्स, डॉक्टर्स आणि वकीलांनी 2018 मध्येच मोरक्कोच्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थला लिहिले होते की, हे व्हर्जिनिटी सर्टिफिकेट्स तरूण महिलांच्या मनावर खोलवर परिणाम करते आणि यावर प्रतिबंध आणला पाहिजे. मात्र, तरीही या देशात या सर्टिफिकेट्सची परंपरा जारी आहे.

फ्रान्सचे शहर पॅरिसमध्ये राहात असलेली मोरक्कोची लेखिका लीला स्लीमानी यांनी आपले पुस्तक सेक्स अँड लाइजमध्ये तरूण महिलांना सहन कराव्या लागणार्‍या आव्हानांबाबत सविस्तर लिहिले होते. या पुस्तकाच्या एका भागात त्या लिहितात, जेव्हा मी टीनेजर होते, तेव्हा मला जाणवले की, माझी व्हर्जिनिटी एक पर्सनल मुद्दा न राहता एक सामाजिक मुद्दा आहे. सोसायटीला तो कंट्रोल करायचा आहे आणि मोरक्कोचे लोक व्हर्जिनिटीबाबत खुपच जास्त संवेदनशील आहेत. युरोपच्या तुलनेत मोरक्कोचे जीवन कोणत्याही महिलेसाठी खुपच जास्त आव्हानांचे आहे आणि या इस्लामिक देशाच्या संस्कृतीमध्ये प्रोग्रेसिव देशांसारखे स्वातंत्र्य जाणवणे केवळ अशक्य आहे.