MoRTH | केंद्र सरकारने बदलले बाईक चालवण्याचे नियम, जाणून घ्या आता मोटरसायलवर मागे कसे बसायचे

नवी दिल्ली : MoRTH | केंद्र सरकारने (central government) वाढत्या रस्ते दुर्घटनांवर (Road Accidents) अंकुश लावण्यासाठी दुचाकी वाहनांचे डिझाईन आणि मागे बसण्याच्या नियमात बदल (New Rules) केले आहेत. रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाच्या (MoRTH) नवीन नियमानुसार, बाईक चालवणार्‍याच्या मागे बसणार्‍या लोकांना काही नवीन नियमांचे पालन करावे लागेल. नवीन नियमाबाबत जाणून घेवूयात…

बाईक रायडर आणि मागच्या सीटच्या मध्यभागी हँड होल्ड

मंत्रालयाच्या गाईडलाईननुसार बाईकच्या पाठीमागील सीटच्या दोन्ही बाजूला हँड होल्ड आवश्यक आहे. मागे बसणार्‍यासाठी दोन्हीकडे फूटरेस्ट अनिवार्य आहे. याशिवाय बाईकच्या मागील चाकाच्या डाव्या भागाचा किमान अर्धा भाग सुरक्षित कव्हर असावा.

बाईकला लावावा लागेल हलका कंटेनर

बाईकला हलका कंटेनर लावावा. त्याची लांबी 550 मिमी, रूंदी 510 मिली आणि उंची 500 मिमी पेक्षा जास्त नसावी. जर कंटेनर मागील प्रवाशाच्या ठिकाणी लावला तर केवळ ड्रायव्हरलाच बसण्याची मंजूरी असेल. म्हणजे दुसर्‍याला बसता येणार नाही. मागील प्रवाशाच्या मागे लावण्याच्या स्थितीत दुसर्‍या व्यक्तीला बसण्याची परवानगी असेल.

टायरसाठी नवीन गाईडलाईन

या अंतर्गत कमाल 3.5 टन वजनापर्यंतच्या वाहनांसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमचा सल्ला दिला
आहे. या सिस्टममध्ये सेन्सरद्वारे ड्रायव्हरला माहिती मिळते. तसचे टायर देखभाल किट ठेवण्याचे
आवाहन केले आहे. यामुळे गाडीत एक्स्ट्रा टायरची आवश्यकता नसेल.

हे देखील वाचा

Pune Crime | चोरीच्या संशयाने मारहाण करुन तरुणाचा खुन, मंचर पोलिसांकडून 4 जणांना अटक

Bullock Cart Race Nagar | अहमदनगरच्या मलकापूरला बैलगाडा शर्यत आयोजित करणार्‍या जुन्नरमधील 6 जणांना अटक

Anti Corruption Trap | स्वातंत्र्यदिनी लाच स्विकारताना महिला ग्रामसेवक ACB च्या जाळ्यात

National Hydrogen Mission | भारतात पाण्यावर चालतील रेल्वे गाड्या आणि कार ! PM नरेंद्र मोदी यांनी केले नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा


ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : MoRTH | central government made major changes in rules of sitting back on the bike know now how to ride

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update