MoRTH | RTO च्या 58 सुविधा आता घरबसल्या मिळतील, ड्रायव्हिंग लायसन्स (DL) सारख्या सुविधांसाठी माराव्या लागणार नाहीत फेर्‍या

MoRTH | morth makes 58 rto services online based on aadhaar authentication latest news update
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – MoRTH | ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी आणि मालकी हस्तांतरण यासारख्या सुविधांसाठी सरकारने दिलासादायक पावले उचलली आहेत. अशा 58 सेवांशी संबंधित कामांसाठी यापुढे प्रादेशिक परिवहन कार्यालयांत (RTO) फेर्‍या माराव्या लागणार नाहीत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासाठी आधार पडताळणीला ग्रीन सिग्नल दिला आहे. मंत्रालयाने स्वेच्छा प्रकारे आधार पडताळणीद्वारे या 58 सेवा पूर्णपणे ऑनलाइन केल्या आहेत. मंत्रालयाने शनिवारी अधिसूचनाही जारी केली आहे. (MoRTH)

 

अधिसूचनेनुसार, या सेवा संपर्करहित आणि फेसलेस पद्धतीने प्रदान केल्या जातील. त्यामुळे लोकांचा वेळ वाचेल. त्यामुळे भार देखील कमी होईल. तसेच यामुळे आरटीओ कार्यालयातील गर्दी कमी होणार आहे. त्यामुळे सरकारच्या कामकाजातही सुधारणा होईल. (MoRTH)

 

या सेवांमध्ये होईल लाभ
शिकाऊ लायसन्ससाठी अर्ज, शिकाऊ लायसन्समधील पत्ता, नाव, फोटो बदलणे, डुप्लिकेट शिकाऊ लायसन्स जारी करणे, शिकाऊ लायसन्स मिळण्याची तरतूद इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट जारी करणे, कंडक्टरच्या लायसन्समधील पत्ता बदलणे आदी कामांसाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही.

आधार नसेल तर काय करावे?
अधिसूचनेनुसार, जर एखाद्या व्यक्तीकडे आधार क्रमांक नसेल तर तो कागदोपत्री फॉर्म भरून या सेवांचा लाभ घेऊ शकतो. यासाठी त्यांना सीएमव्हीआर, 1989 अंतर्गत वैकल्पिक कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करावी लागतील.

 

व्यवसाय प्रमाणपत्राची वैधता वाढवली
व्यवसाय प्रमाणपत्र प्रणाली सुलभ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी मंत्रालयाने केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 अंतर्गत नवीन नियम अधिसूचित केले आहेत.
व्यवसायिक सुलभतेला चालना देण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
नवीन नियमांनुसार व्यवसाय प्रमाणपत्राची वैधता एक वर्षावरून पाच वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
सध्याच्या नियमांमधील काही त्रुटींमुळे, अनेक प्रकरणांमध्ये व्यवसाय प्रमाणपत्रांच्या प्रासंगिकतेचे वेगवेगळे
अर्थ लावल्यामुळे अनेक व्यावसायिक संस्था समस्येचा सामना करत होत्या.

 

Web Title :- MoRTH | morth makes 58 rto services online based on aadhaar authentication latest news update

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena | …शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी देताना यावर्षीच दिरंगाई का? सुनिल प्रभूंनी केले हे वक्तव्य

 

Pune Crime | मोठ्या भावानेच केला लहान भावाचा गळा दाबून खून, पुण्यातील कोंढवा परिसरातील घटना

 

Pune Crime | गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या, 8 दिवसांपासून होता बेपत्ता; लोणी काळभोर परिसरातील घटना

Total
0
Shares
Related Posts