मोटर वाहन कायद्यात पुन्हा होणार फेरबदल, मंत्रालयाने मागवल्या जनतेकडून सूचना

नवी दिल्ली : केंद्र सरकार मोटर वाहन कायद्यात पुन्हा मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत आहे. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सुद्धा नवे नियम लागू करण्यात आले होते, ज्यानंतर चलानच्या रक्कमेत प्रचंड वाढ करण्यात आली होती. नवे नियम बनवण्यापूर्वी प्रथम सर्व स्टेकहोल्डर्स आणि नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत.

या नियमांमध्ये होणार फेरबदल

जे नियम बदल्यासाठी सूचना मागवण्यात आल्या आहेत, ते नव्या गाड्या, ड्रायव्हिंग लायसन्स आणि जुन्या गाड्यांच्या रिकॉल संबंधी नियम आहेत. यासाठी 18 मार्चरोजी नोटिफिकेशन जारी करण्यात आले होते. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्याने आता पुन्हा सूचना मागवण्यात आल्या आहेत. यासाठी दोन नोटिफिकेशन 29 मे 2020 ला जारी करण्यात आल्या होत्या.

यासाठी मागवल्या सूचना

नवीन डीएल बनवणे, सरेन्डर किंवा रिन्युव्हलसाठी इलेक्ट्रॉनिकपद्धतीने मेडिकल सर्टिफिकेट मागवणे, लर्नर लायसन्स साठी ऑनलाइन अर्ज, नॅशनल रजिस्टर, डीलर पॉईंट रजिस्ट्रेशन, 60 दिवसापूर्वी गाडीच्या रजिस्ट्रेशनचे रिन्युव्हल, सहा महिन्यांसाठी अस्थाई रजिस्ट्रेशन ज्यामध्ये एक महिन्याचा अतिरिक्त वेळ देणे, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ट्रेड सर्टिफिकेट, गाडीत कोणतेही बदल करण्यासाठी ऑनलाइन मंजूरी इत्यादीचा समावेश आहे.

दुसर्‍या नोटिफिकेशनमध्ये खराब झालेल्या गाड्यांच्या रिकॉल पॉलिसीबाबत सूचना मागवण्यात आल्या आहेत. नोटिफिकेशनमध्ये हेदखील म्हटले आहे की, सूचना मंत्रालयाचे संयुक्त सचिव (ट्रान्सपोर्ट) यांना 60 दिवसाच्या आत ई-मेल [email protected] वर पाठवावा.