केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचा कोरोनामुळे मृत्यू, AIIMS मध्ये झालं निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संसर्गाने ग्रस्त केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाले आहे, सुरेश अंगडी यांना उपचारासाठी दिल्लीत एम्समध्ये दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या वृत्तामुळे त्यांच्या कुटुंबाबरोबरच केंद्रीय मंत्रिमंडळात शोककळा पसरली आहे. 1 जून 1955 रोजी जन्मलेले सुरेश अंगडी हे भारतीय राजकारणी होते. ज्यांनी 2004 पासून खासदार म्हणून आणि 2019 ते 2020 पर्यंत रेल्वे राज्यमंत्री म्हणून आपले निधन होईपर्यंत काम केले. ते कर्नाटक राज्यात भारतीय जनता पक्षाचे नेते होते. 2004 (14 व्या लोकसभा), 2009, 2014 आणि 2019 मध्ये बेलागावी येथून ते लोकसभेवर निवडून गेले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत ट्विट केले, पंतप्रधान म्हणाले, “सुरेश अंगडी एक असामान्य कार्यकर्ता होते, ज्यांनी कर्नाटकमध्ये पक्षाला बळकट करण्यासाठी परिश्रम घेतले .. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे अतिशय दु: खी . यासोबतच अनेक राजकारण्यांनी अंगडीच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. केंद्रीय मंत्री यांच्या निधनाबद्दल कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी दु: ख व्यक्त केले. ते म्हणाले, “अंगद जी नेहमी हसत होते. मला ही बातमी ऐकून फारच दुःख झाले”, असे त्यांनी ट्विट केले. तर भाजप नेते संबित पात्रा यांनी त्यांच्या निधनाबद्दल ट्विट केले-

कोविद – 19 च्या कचाट्यात आलेल्या केंद्रीय मंत्र्यांमध्ये गृहमंत्री अमित शहा, कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी, आयुष मंत्री श्रीपाद नाईक, जलऊर्जा मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, संसदीय काम राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश आहे. यात माहितीनुसार 11 सप्टेंबरला सुरेश अंगडी कोरोना संसर्गित असल्याचे आढळले. स्वत: सुरेश अंगडी यांनी ट्विट करून माहिती देताना म्हंटले की, “आज माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी याक्षणी चांगला आहे. यासह यांनी आवाहन केले की, जे लोक गेल्या काही दिवसांत त्याच्या संपर्कात आले त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि काही लक्षणे आढळल्यास त्यांची तपासणी करुन घ्यावी.