मोशीत ‘सेक्स रॅकेट’, दोघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

मोशी परिसरात सुरु असलेले ‘सेक्स रॅकेट’ गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने उध्वस्त केले. चार मुलींची सुटका करुन रॅकेट चालवणारी महिला आणि हॉटेल व्यवस्थापकास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास एमआयडीसी येथील जंजीर हॉटेल मध्ये कारवाई करण्यात आली.

[amazon_link asins=’B00RBGYGMO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’675cdcd6-8fbd-11e8-9c09-318d51a23683′]

फुलठुशी मुशीद शेख खातून (रा. तापकीर चाळ, मोशो) या महिलेस आणि मोहन माधव शिंदे या हॉटेल व्यवस्थापकास अटक केली आहे. आकाश हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मोशी परिसरात एक महिला वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागास मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक तयार केला. संबंधीत महिलेशी संपर्क साधला असता तिने एक तरुणी देण्याचे ठरले. एमआयडीसी येथील हॉटेल जंजीर येथे एक रूम बुक केली. ती तरुणी त्या रूम वर आल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. त्यानंतर चौकशी करून इतर तीन मुलींची सुटका केली आणि मुख्य महिलेस हॉटेल व्यवस्थापकास अटक केली. तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे आणि सहाय्यक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.