डास चावल्याने होतात ‘हे’ 5 गंभीर आजार, ‘या’ 4 उपायांनी डासांना टाळू शकता, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   ओलावा, दमट हवामान अशा स्थितीत डासांची उत्पत्ती मोठ्याप्रमाणात होते. डासांचा प्रादुर्भाव टाळला तर अनेक गंभीर आजार टाळता येऊ शकतात. कारण सगळ्यात घातक किटकांमध्ये डासांचा समावेश होतो. डास चावल्यामुळे मृत्यूला तोंड द्यावे लागते. कोरोना काळात अशाप्रकारे आजारी पडणे, सध्यातरी परवडणारे नाही. यामुळे अनेक परिणाम तुमच्यावर होऊ शकतात. डास चावल्याने कोणते आजार होतात, डांसाचा प्रादुर्भाव कसा टाळावा आणि डास पळवण्यासाठी कोणते उपाय करावेत, ते जाणून घेवूयात…

हे गंभीर आजार होतात

1 चिकनगुनिया
2 येल्लो फीवर
3 डेंग्यू
4 मलेरिया
5 झिका

हे उपाय करा

1 कॉईल ऐवजी कापूर जाळा आणि 15 ते 20 मिनिटे धूर होऊ द्या.

2 दारात किंवा खिडकीत तुळशीचं रोप लावा.

3 कडूलिंबाचं तेल आणि खोबरेल तेल एकत्र करुन शरीरावर लावा.

4 लिंबाचं तेल आणि निलगीरी तेलाचं मिश्रण डासांना दूर ठेवू शकतं.