देशात या 5 नोकऱ्यांमधून सर्वाधिक मिळतो पगार, नंबर 1 सर्व भारतीयांची पसंत, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जगातील सर्व लोकांना असं वाटत असते की त्यांना सरकारी नोकरी मिळावी. कारण सरकारी नोकरी म्हटलं की सिक्युरिटी असंच समजले जात. पण सरकारी नोकऱ्यांमध्ये कोणत्या अशा नोकऱ्या आहेत ज्यात सर्वाधिक पगार दिला जातो. हे तुम्हाला माहित आहे का. भारतात या ५ उत्तम सरकारी नोकऱ्या आहेत जेथे पगार हा खुप चांगला मिळतो.

१. शिक्षक

शिक्षक म्हणून काम करणे अनेकांना आवडते. शिक्षकांना दिला जाणारा पगार हा भारतातील ५ व्या क्रमांकाचा सर्वोत्तम पगार मानला जातो. शिक्षक शाळेतून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करतात. महाविद्यालयात प्राध्यापक शिकवतात. या नोकरीत चांगला पगार आणि अधिक सुविधा मिळत असतात.

२. सरकारी बँकेत नोकरी

बँकेत काम करणेही आरामदायी काम समजले जाते. त्यामुळे बँकेत जर मॅनेजर पदावर काम केले तरी वर्षाला एकूण ५ ते १० लाख रुपये पगाराच्या स्वरूपात मिळतात. त्यामुळे हा एक उत्तम पगार मानला जातो. या नोकरीत सर्व सरकारी सुट्टया आणि वेळही मिळतो.

३. संरक्षण

संरक्षण क्षेत्रात काम करणे ही एक चांगली आणि सन्मान देणारी नोकरी आहे. या क्षेत्रात बरेच पगार मिळतात. संरक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्याला दरमहा ५० ते ६० हजार रुपये मिळतात. संरक्षण क्षेत्रातील नोकरी चांगला पगार आणि चांगल्या सुविधा देते.

४. सार्वजनिक क्षेत्र एकक (PSU)

ही जी नोकरी आहे ती भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नोकरी मानली जाते. या नोकरीत अधिक पगारासह सुविधाही दिल्या जातात. कोल इंडिया लिमिटेड किंवा इंडियन ऑइल कॉर्पोरेशनसारख्या सरकारी कंपन्यांमध्ये ही नोकरी करणे असते. बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार कोल इंडिया आपल्या कर्मचार्‍यांना वर्षाला ८ ते १० लाख रुपयांते पॅकेज दिले जाते.

५. भारतीय प्रशासन सेवा (आयएएस)

भारतीय प्रशासन सेवा ही भारतातील सर्वात चांगली नोकरी मानली जाते. आयएएस अधिकाऱ्याला चांगला पगार तसेच चांगली सुविधा दिली जाते. तसंच त्यांना फार मान-सन्मानही दिला जातो.

आरोग्यविषयक वृत्त