‘हे’ भारतातील 4 गावं, तिथलं ‘सौंदर्य’ आणि ‘वातावरण’ जाणून तुमची जाण्याची होईल इच्छा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कला, संस्कृती आणि परंपरा यांची जपणूक करणारी धरती म्हणजे भारत देश. त्यामुळे भारतात खूप काही पाहण्यासारखे आहे. जर आपण कितीही भटकंती करणारे हौशी पर्यटक असाल परंतु भारतातील अनेक गोष्टी आपल्या पाहण्यातून सुटल्या असतील, किंबहुना त्याबाबत आपल्याला अजून माहितीही नसेल. आपण नेहमी त्याच त्याच बहुचर्चित ठिकाणी फिरायला जात असाल तर कसे भारत फिरू शकणार. काश्मीरला पृथ्वीचे स्वर्ग म्हटले जाते, परंतु काश्मीरसारखेच देशात अशी काही गाव आहेत ते स्वर्गापेक्षा कमी नाहीत. ही गावं दिसायला जरी छोटी असतील मात्र ते काश्मीर पेक्षा कमी नाहीत, चला तर अशा चार गावांबद्दल जाणून घेऊ…
meghalaya

स्मित, मेघालय

मेघालयची राजधानी शिलॉंग पासून फक्त ११ किलोमीटरच्या अंतरावर डोंगरावर वसलेले ‘स्मित’ गाव जणू निसर्गाची चादर ओढून बसलेले दिसते. शहराच्या प्रदूषणापासून लांब असलेल्या या गावातील शुद्ध हवा आणि ताजेपणा आपला तणाव दूर करते. या कारणामुळेच या गावाला प्रदूषणमुक्त गावाचा दर्जा प्राप्त झाला आहे. स्मित गाव इतके सुंदर आहे की या गावातील निसर्गाचे दृश्य आपल्याला आश्चर्यचकित करून सोडतील. या गावात राहणारे लोक भाजीपाला आणि मसाला पिकांची शेती करतात.
malana

मलाना, हिमाचल प्रदेश

मलाना गाव हिमाचलच्या कुल्लू खोऱ्याच्या उत्तरेस पार्वती खोऱ्याच्या हिरव्यागार निसर्गाने व्यापलेले आहे. मलाना नदीजवळील सुंदर टेकड्यांच्या काठावर वसलेल्या या गावाचे सौंदर्य अवर्णनीय आहे. येथील अद्भुत दृश्ये लोकांना आकर्षित करत असतात. येथे येणारे पर्यटक या गावाबाहेर कॅम्प लावून थांबतात. येथे बाहेरील लोकांना गावात जाण्यास व तेथील वस्तूंना स्पर्श करण्यास मनाई आहे.

tea garden

मिरिक, पश्चिम बंगाल

मिरिक हे दार्जिलिंगच्या पश्चिमेस समुद्रसपाटीपासून सुमारे ४९०५ फूट उंचीवर वसलेले एक छोटेसे गाव आहे. हिमालयाच्या मैदानांमध्ये देवदारने वेढलेला मिरिक तलाव येथील दृश्यांना अधिक सुंदर बनवतो. येथील चहाचे मळे, वन्य फुलांची चादर, क्रिप्टोमेरियाचे वृक्ष येणाऱ्या पर्यटकांना खूप आकर्षित करतात.

Khonoma

खोमोना, नागालँड

निसर्गावर प्रेम करणाऱ्या खूप कमी लोकांना हे माहित असेल की खोमोना हे गाव आशिया खंडातील पहिले हरित गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे गाव कोहिमा पासून २० किमी दूर खोमोनाच्या मैदानावर वसलेले आहे. या गावात १०० पेक्षा अधिक जाती जमातीचे लोक राहतात. जर आपण या गावाला बारकाईने पाहिले तर आपल्या लक्षात येईल की खोनोमामध्ये असलेले प्रत्येक घर हे एकमेकांशी जोडलेले आहे. याशिवाय येथे बांधलेल्या प्रत्येक घराच्या दाराशी एक खास प्रकारचे शिंग लावलेले असते. सांगितले जाते की हे ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी लटकवण्यात आले आहे. सुमारे २५० प्रजातींच्या वनस्पती येथे आढळतात.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like