TikTok वर बनवत असाल व्हिडीओ तर ‘कमाऊ’ शकता कोट्यावधी रूपये, ‘हा’ आहे फंडा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टिकटॉकचे क्रेझ सध्या दिवसेंदिवस वाढत चालले आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी टिकटॉकचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मात्र टिकटॉकवरील व्हिडीओवरून आता पैसे देखील कमावता येणार आहेत.

अनेक मोठ्या कंपन्यांचे ब्रँड टिकटॉकसोबत जोडले जाऊन युजर्सला पैसे कमावून देणार आहेत. नुकतेच मोबाईल ब्रँड असलेल्या itel कंपनीने टिकटॉवर युजर्सला व्हिडीओ बनवण्याचे आवाहन केले होते यासाठी कंपनीने युजर्सला काही रक्कमही देण्यात येणार होती. Amazfit, Moov आणि Bingo सारख्या कंपन्या युजर्सला पैसे कमवून देण्यासाठी अनेक प्लॅन देत आहेत.

या अटी आहेत महत्वाच्या
जास्तीत जास्त फॉलोअर्स असलेल्या व्यक्तींना ब्रँड कंपन्यांकडून थेट विचारणा केली जाते आणि त्यानंतर युजर्सला त्यांच्या ब्रँडसाठी व्हिडीओ बनवावा लागते आणि यासाठी कंपन्यांकडून युजर्सला मोठा मोबदला देखील दिला जातो. मात्र यासाठी तुमचे फॉलोअर्स सर्वाधिक असणे गरजेचे आहे.

माइंडशिफ्ट इंटरएक्टिवचे सीईओ जफर रईस यांच्या मते टिकटॉकवर एक लाखापेक्षा अधिक फॉलोअर्स असतील त्याला जास्त संधी मिळू शकते. भारतात टिकटॉकला सर्वाधिक पसंती दिली जाते.

भारतात सर्वात जास्त युजर्स आहेत टिकटॉकचे
टिकटॉकचे सगळ्यात जास्त युजर्स भारतामध्ये आहेत, जगभरात या अँपचे 1.5 अरब युजर्स आहेत. 2019 मध्ये 27.76 कोटी लोकांनी हे अँप डाउनलोड केलेले आहेत. वर्षातील टिकटॉक हे बिना गेमचे अँप असूनही डाऊनलोडींच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. यामध्ये पहिला क्रमांक व्हाट्सअ‍ॅप आणि दुसरा क्रमांक फेसबुक मेसेंजरचा आहे, तर चवथ्या क्रमांकावर फेसबुक आणि पाचव्या क्रमांकावर इंस्टाग्राम आहे.

Visit : Policenama.com