Most Expensive : पत्नीला घटस्फोट देणं खेळाडूंना पडलं ’महागात’; पोटगीची किंमत ऐकून चक्रावेल डोकं !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रीडा विश्व असो की, चित्रपट यामध्ये अनेक जोडपी नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. मात्र, यापैकी काही जोडपी नंतर विभक्त होताना दिसतात. त्यांचे विभक्त होणेसुद्धा चाहत्यांसाठी एक मोठी बातमी असते. या बातम्या खुप उत्कंठेने वाचल्या जातात. या दोन्ही क्षेत्रातील घटस्फोट हे अनेकदा महागडे ठरतात. अशा महागड्या घटस्फोटांची चर्चा जरा जास्तच होते. चाहत्यांना या घटस्फोटांची माहिती घेण्यात उत्सुकता वाटत असली तरी सेलीब्रिटींना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. पत्नीला घटस्फोट देताना अनेक सेलीब्रिटींना पोटगी म्हणून प्रचंड मोठी रक्कम द्यावी, लागल्याचे अनेक किस्से नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत.

जगातील सर्वोत्कृष्ट गोल्फपटू टायगर वूड्ससह दिग्गज बॉक्सर माईक टायसन यांना पोटगी म्हणून माजी पत्नीला मोठी रक्कम मोजावी लागली होती. ही रक्कम सर्वसामान्यांनी ऐकली तर त्यांचे डोके चक्रावल्याशिवाय राहणार नाही. बास्केटबॉलपटू शकिल ओनील आणि त्याची पत्नी शॉनी यांचा संसार 9 वर्षानंतर मोडला. घटस्फोटानंतर त्याला दर महिना 15,34,080 रक्कम शॉनीला द्यावी लागते. शकिलची एकूण मालमत्ता 1887 कोटी आहे. माजी पत्नी आणि चार मुलांना सांभाळण्यासाठी त्याला ही रक्कम मोजावी लागते.

दिग्गज बॉक्सर माईक टायसन आणि रॉबीन गिव्हन्स यांचा संसार अवघा एक वर्ष टिकला. टायसनला घटस्फोटानंतर तिला 76 कोटी 75 लाख 88,912 द्यावे लागले होते.

तर, दिग्गज गोल्फपटू टायगर वूड्स आणि एलिन नॉर्डग्रेन यांचा घटस्फोट सुद्धा क्रीडा विश्वातील सर्वात महागडा घटस्फोट म्हणून ओळखला जातो. वूड्सला त्याच्या पत्नीला तब्बल 766 कोटी रूपये पोटगी म्हणून द्यावे लागले होते.

गोल्फपटू ग्रेग नॉर्मन आणि लॉरा अँडरसी यांचा संसार 22 वर्षानंतर 2007मध्ये मोडला. त्याला पत्नीला 794 कोटी द्यावे लागले.

बास्केटबॉल खेळाडू मायकेल जॉर्डन आणि जॉनिटा जॉर्डन यांनी 17 वर्षानंतर घटस्फोट घेतला. 1989मध्ये लग्न केले. मायकल जॉर्डनला पोटगी म्हणून 1283 कोटी द्यावे होते.

इंग्लिश प्रीमिअर लीगमधील चेल्सी फुटबॉल क्लबचा मालक रोमन अब्रामोव्हिम याने पत्नी एरिनाला 9574 कोटी रूपये दिले. त्यांचा घटस्फोट सुद्धा सर्वात महागडा म्हणून ओळखला जातो.

ब्रिटीश गोल्फपटू निक फॅल्डोने 2006 मध्ये पत्नी वॅलेरी ला घटस्फोट दिला. 5 वर्षांचा संसार मोडल्यानंतर पोटगी म्हणून निकला तिला 71 कोटी रूपये द्यावे लागले. निकची एकूण मालमत्ता 335 कोटी 64 लाख 89,774 आहे.

डब्ल्यूडब्ल्यूई स्टार हल्क हॉगन म्हणजेच टेरी बोलीआ याने 1983मध्ये लिंडा क्लॅरीडशी लग्न केले होते. 2009मध्ये त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर त्याला पत्नीला 105 कोटी रूपये द्यावे लागले होते.

प्रसिद्ध बेसबॉल खेळाडू अ‍ॅलेक्स रॉड्रीगेज याने 2002मध्ये सिंथीया स्कर्टीसशी लग्न केले. दोन मुल आहेत. 2008मध्ये त्यांचा वाद झाल्याने त्यांनी घटस्फोट घेतला. अ‍ॅलेक्सला घटस्फोटानंतर सिंथीयाला 134 कोटी द्यावे लागले.

प्रसिद्ध सायकपटू लान्स आर्मस्ट्राँग याने 1997मध्ये पत्रकार क्रिस्टीनशी विवाह केला. 2003मध्ये दोघे विभक्त झाले. पोटगी म्हणून लान्स याने पत्नीला 143 कोटी रूपये दिले. त्याची एकुण मालमत्ता 1006 कोटी आहे.