देशातील ५० टक्के लोकांना ‘या’ जीवघेण्या आजाराबाबत माहीत नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आजच्या धकाधकीच्या जीवनात त्याचबरोबर बदलत्या वातावरणामुळे वेगवेगळे आजार डोके वर काढू लागतात. अनेक आजारांचा लोकांना सामना करावा लागतो. यामध्ये लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत लोकांना आजार उद्भवत असतात. भारतात वाढत असलेला आजार म्हणजे हाय ब्लड प्रेशर त्याहून धक्कादायक म्हणजे भारतातील केवळ ४५ टक्के लोकांना हाय ब्लड प्रेशरचा सामना कसा करायचा हेच माहित नाही.

१५ ते १९ वयोगटातील ५.३ टक्के पुरुष आणि १०.९ टक्के महिलांमध्ये ब्लड प्रेशर नियंत्रित आढळला आहे. एका सर्वेक्षणानुसार भारतात दर ४ पैकी ३ व्यक्ती असे आहे. ज्यांनी ब्लड प्रेशर तपासला नाही. त्याचबरोबर ५० टक्के भारतीयांना माहित नाही की, त्यांना हाय ब्लड प्रेशर आहे की नाही. ४५ टक्के असे रुग्ण आसे आहेत, जे याचे शिकार आहे. १३ टक्के रुग्ण बीपी दूर करण्यासाठी उपचार घेत आहे. ८ टक्के असे आहे ज्यांचे ब्लड प्रेशर नियंत्रित आहे.

सर्वेक्षणानुसार ही बाब समोर आली आहे की, १५ ते ४९ वयोगटातील ७ लाक ३१ हजार ८६४ लोकांवर सर्वे करण्यात आला. देशभरात करण्यात आलेल्या सर्वेमध्ये २९ राज्य आणि ७ केंद्र शासित प्रदेशांचा सामावेश आहे. हाय ब्लड प्रेशरचे ६१.३ टक्के रुग्ण मध्यप्रदेशात आहे. आणि सर्वात जास्त ९३.५ टक्के रुग्ण हरियाणामध्ये आहे. हाय बापी जागरुकता स्तर सर्वात कमी छत्तीसगढ (२२.१) टक्के आणि सर्वाधिक पुद्दुचेरी (८०.५ टक्के आहे).

सर्वेक्षणानुसार डॉ. दोराईराज प्रभाकरन यांनी सांगितले की, ‘हाइपरटेंशन’ची माहिती मिळवणे आणि त्यावर उपचार करणे सोपे आहे. त्यामुळे त्याला नियंत्रित केले जाऊ शकते. याला नियंत्रित करुन स्ट्रोक, हार्ट अटॅक आणि मृत्यूचा धोका थांबवला जाऊ शकतो.’

हाय बीपी कंट्रोल करणे कठिण नाही या सर्व्हेतून समोर आलं आहे की, देशभरात हाइपरटेंशन नियंत्रित करण्याचा स्तर १० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे या रिसर्चमध्ये हाइपरटेंशन रोखणे आणि जागरूक करण्याचे प्रयत्न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या रिसर्चशी संबंधित डॉ. दोराईराज प्रभाकरन यांनी सांगितले की, ‘हाइपरटेंशन’ची माहिती मिळवणे आणि त्यावर उपचार करणे सोपं आहे. त्यामुळे याला नियंत्रित केलं जाऊ शकतं. याला कंट्रोल करून स्ट्रोक, हार्ट अटॅक आणि मृत्यूचा धोका थांबवला जाऊ शकतो’.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like