‘हे’ App खुपच भावतय ‘अफेयर’ करण्यासाठी भारतीय पुरूष – स्त्रीयांना, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एक्स्ट्रा मॅरिटल डेटींग अ‍ॅप ग्लीडेन पुन्हा एकदा चर्चेत आहे. ग्लीडेनच्या नुकत्याच झालेल्या सर्वेमधून असं समोर आलं आहे की, जवळपास 8 लाख भारतीयांनी ग्लीडेनवर रजिस्ट्रेशन केलं आहे. खास बात अशी की, ग्लीडेनवर महिलांची संख्या सर्वात जासत आहे. या अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन करण्यात बंगळुरू अग्रभागी आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा सर्वे करण्यात आला आहे. जेव्हा लोकांच्या सुट्ट्या संपल्या होत्या आणि मुलं शाळेत गेली होती.

नोव्हेंबर 2019 मध्ये केलेल्या एका सर्वेतून असं समोर आलं की, ग्लीडेनवर येणाऱ्या लोकांमध्ये मुंबई, कोलकाता, दिल्ली, पुणे, हैद्राबाद, चेन्नई, गुडगाव, अहमदाबाद, जयपूर, चंदीगढ, लखनऊ, नोएडा, सुरत, भुवनेश्वर या शहरातील लोकांची संख्या जास्त होती.

एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करणाऱ्या विवाहितांसाठी ग्लीडेन जगातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे. अनेक विवाहित लोक आता फ्रान्सच्या या डेटींग प्लॅटफॉर्मवर आपली लाईफलाईन शोधत आहेत जे आपल्या वैवाहिक जीवनापासून खुश नाहीत. फ्रेंच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर अ‍ॅपची ग्रोथ रेट 567 टक्के आहे. एक्स्ट्रा मॅरिटल अ‍ॅपसाठी वापरलं जाणारं ग्लीडेन हे जगातील पहिलं अ‍ॅप आहे. 2009 साली हे फ्रान्समध्ये तर 2017 साली हे भारतात लाँच झालं होतं. कंपनीच्या मॅनेजर सोलेन पॅलेट म्हणतात, “भारतात कोणत्याही मार्केटींग शिवाय याचे सब्सक्रायबर्स वाढत आहेत. लोक फ्लर्टींगसाठी याचा वापर करताना दिसत आहेत.”

पॅलेट पुढे सांगतात की, “महिलांमध्ये या अ‍ॅपची लोकप्रियता वेगानं वाढत आहे. गेल्या वर्षी या अ‍ॅपवर भारतीय महिलांची संख्या 25 टक्के होती. जी वाढून 35 टक्के झाली आहे. महिलांची या अ‍ॅपवरील संख्या जास्त वाढताना दिसत आहे.”

महत्त्वाची बाब अशी की, ग्लाीडेन डॉट कॉम महिलांचा एक ग्रुप चावलतं. हे अ‍ॅप महिलांसाठी निशुल्क आहे. पुरुषांसाठी याची किंमत ठरली आहे. या अ‍ॅपवर येणाऱ्यांपैकी 34 ते 49 वयोगटातील लोक आहेत. भारतातून या अ‍ॅपवर येणाऱ्यांमध्ये बहुत करून डॉक्टर्स, वकिल, आणि वरिष्ठ कार्यकारी अशांची संख्या जास्त आहे.

ग्लीडेनचा दावा आहे की, हे अ‍ॅप ओळख लपून ठेवण्याची पूर्ण गॅरंटी आहे. या प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी वैवाहिक स्थिती, मुलांची संख्या, व्यवसाय, उत्पन्न, फिगर, केसांचा रंग आणि लांबी, डोळ्यांचा रंग आणि सवयींसोबतच अनेक खासगी माहिती द्यावी लागते.