लॉकडाऊनमध्ये बहुतेक लोक जठरासंबंधी विकाराने त्रस्त !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. या लॉकडाऊनच्या काळावधीत अनेक रूग्ण जठरासंबधी विकाराने त्रस्त होते. कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक लोक घाबरून घराबाहेर पडत नव्हते. अशा स्थितीत पोटदुखी, मळमळ, तीव्र वेदना, संसर्ग, कावीळ, रक्तस्त्राव याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आजाराची गुतांगुत वाढल्यानंतर रूग्ण उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाले होते. अशावेळी शस्त्रक्रिया करणं हा एकच पर्य़ाय होतो. त्यानुसार २२ मार्च ते ३० सप्टेंबर या कालावधीत १२२ रूग्णांवर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयाने केलेल्या सर्वेक्षणातून हे समोर आले आहे.

कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात भारतात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. रूग्णांची संख्या वाढत असल्याने आऱोग्य यंत्रणेवर याचा अतिरिक्त भार पडत होता. कोविड-१९ चा संसर्ग होईल, या भितीमुळे लोक डॉक्टरांकडे उपचारासाठी येण्यास धास्तावत होते. अशावेळी आजाराचे वेळेवर अचूक निदान व उपचार न झाल्याने गुतांगुंत वाढ शकते, या अनुषंगाने लॉकडाऊन दरम्यान वोक्हार्ट रूग्णालयाने सर्व प्रकारचे कर्करोग, सौम्य आजार आणि लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया सुरू ठेवल्या होत्या. त्यानुसार लॉकडाऊनच्या काळात गॅस्ट्रोइंटेस्टाइनल या समस्येने पिडित रूग्णांवर उपचार करणे शक्य झाले आहे.

मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील सल्लागार सर्जिकल गॅस्ट्रो आणि जीआय ऑन्कोसर्जरी डॉ. इम्रान शेख म्हणाले की, “ रूग्णालयाद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार २२ मार्च ते ३० सप्टेंबर या कालावधीत १२२ रूग्णांवर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया करून घेणारे ५२ रूग्ण हे ५० ते ७० वर्ष वयोगटातील होते. तर ३० ते ४० वयोगटातील २५ रूग्णांवर ह शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ओटीपोटीत तीव्र वेदना होणं आणि मळमळ होणं अशी लक्षणे या रूग्णांमध्ये दिसून आली होती. शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या एकूण रूग्णांपैकी ६९ महिला होत्या. महत्त्वाच म्हणजे ६५ जणांवर तातडीच्या (ओपन) शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून ५७ जणांवर लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पाच जीआय कर्करोगाच्या रुग्णांवरही शस्त्रक्रिया करण्यात आली होती.’’

‘‘लॉकडाऊनमुळे रूग्ण लवकर उपचारासाठी न आल्याने आजार वाढू शकतो. त्यामुळे कुठलाही त्रास होत असल्यास लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण वेळेवर उपचार मिळाल्यास रूग्ण पटकन बरा होऊ शकतो’’, असेही डॉ. शेख म्हणाले.

डॉ. शेख पुढे म्हणाले, “गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या असलेल्या रूग्णांवर उपचार करताना कोविड-१९ च्या प्रोटोकॉलचे पालन करण्यात येत आहे. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल चाचणी केली जात आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रूग्णासोबत एकाच नातेवाईकाला थांबण्याची परवानगी देण्यात आली होती. याशिवाय बाह्यरुग्ण विभागासाठी सुद्धा (ओपीडी) नियमावली लागू करण्यात आली होती. लिफ्टमध्येही व्यक्तीची संख्या मर्यादित ठेवण्यात आली होती. दर तासाला रूग्णालयाची स्वच्छता करण्यात येत आहे.”