जगातील ‘या’ 3 देशांत सर्वाधिक हिंदू लोकसंख्या, जाणून घ्या भारताचा क्रमांक

पोलीसनामा ऑनलाईन टीम – हिंदू धर्माचा उदय भारतात झाला आणि नंतरच्या काळात हा धर्म जगभर पसरल्याचे आपल्याला माहित आहे. आज सर्वात जास्त हिंदू लोकसंख्या भारतात असली तरी हिंदुबहुल लोकसंख्येची टक्केवारी लक्षात घेता या यादीत भारताचा क्रमांक पहिला नाहीये. तर पाहुयात हिंदुबहुल लोकसंख्येची यादी आणि जाणून घेऊयात कितवा आहे भारताचा क्रमांक ?

१. नेपाळ :
हिंदुबहुल देशांच्या यादीमध्ये नेपाळला प्रथम स्थानावर येतो. नेपाळची एकूण लोकसंख्या २ कोटी ९० असून त्यापैकी हिंदू धर्माच्या लोकांची संख्या जवळपास ८१.३ % आहे. म्हणजेच नेपाळमध्ये जवळपास अडीच कोटी हिंदू लोक राहतात.

२.भारत :
नेपाळनंतर या यादीमध्ये भारताचा क्रमांक लागत असून भारतातील ७९.८ % लोकसंख्या हिंदू आहे. म्हणजेच भारताच्या १ अब्ज ३२ कोटी लोकसंख्येपैकी १ अब्ज ४ कोटी लोक हिँदुधर्मीय आहेत. हिंदू धर्माचा उदय भारतात झाला असून नंतरच्या काळात तो इतर देशांमध्ये पसरला.

३.मॉरिशिअस :
हिंदुबहुल देशांच्या यादीमध्ये तिसरा क्रमांक मॉरिशिअस या देशाचा येतो. या देशातील एकूण लोकसंख्येपैकी ४९ % लोकसंख्या हिंदुधर्मीय आहे. म्हणजेच देशाच्या १२ लाख ५० हजार लोकसंख्येपैकी ६ लाख लोक हिंदुधर्मीय आहेत.

या तीन देशांतील हिंदू लोकसंख्येची ही माहिती पहिली की हे स्पष्ट होते की जगातील हिंदु धर्मातील ८७% लोक भारत, नेपाळ आणि मॉरिशसमध्ये राहतात. सविस्तर आकडेवारी लक्षात घेता ख्रिश्चन धर्म जगभरातील अनुयायांच्या बाबतीत सर्वात मोठा आहे तर हिंदू धर्म हा जगातील तिसरा मोठा धर्म आहे. तर इस्लाम दुसर्‍या क्रमांकावर आहे.

आरोग्यविषयक वृत्त