न्यूक्लिअर मिसाइलच्या सहाय्याने भारत करणार जलमार्गाने ‘हल्ला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत अजून एक न्यूक्लिअर मिसाइलची चाचणी करणार आहे. डिफेंस रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनाझेशन (डीआरडीओ) 8 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम किनाऱ्यावरून याबाबतची चाचणी करणार आहे. पाण्यात तयार केलेल्या एका प्लॅटफॉर्मवरून याचे लॉंचिंग केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या मिसाइलचे नाव के – 4 न्यूक्लियर मिसाइल असे आहे. हे मिसाइल 3500 किमी दूर असलेले लक्ष सुद्धा अगदी सहज गाठू शकते. पाण्याखाली चालणारी ही देशातील दुसरी मिसाइल आहे.

या आधी भारताने B0 – 5 या न्यूक्लियर मिसाइलची यशस्वी चाचणी केली होती. जिची मारक क्षमता 700 किलोमीटर पेक्षा अधिक होती. त्या हिशोबाने के-4 ही मिसाइल आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली मिसाइल आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्याच महिन्यात या मिसाइलची चाचणी होणार होती मात्र काही कारणास्तव ही चाचणी पुढे ढकलण्यात आली.

अमेरिका, ब्रिटन, फ्रांस, रूस आणि चीन नंतर जगात भारत हा सहावा देश आहे ज्याच्याकडे पाण्यात हल्ला करता येईल अशी न्यूक्लिअर मिसाइल आहे. 2016 मध्ये आईएनएस अरिहंत या पाणबुडीला नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार याच पाणबुडीच्या सहाय्याने मिसाइल सोडण्यात येणार आहे. डीआरडीओ पुढील काही आठवड्यांमध्ये ब्राम्होस मिसाइलची चाचणी करण्याची योजना करत आहे.

Visit : Policenama.com