अमेरिका, इंग्लंडचा नव्हे तर ‘या’ देशाचा पासपोर्ट जगात सर्वात ‘पावरफुल’, भारत ‘या’ नंबरवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात तुम्हाला कुठेही फिरायचे असेल तर पासपोर्ट सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे पासपोर्ट हे जगभरातील सर्वात महत्वाचे कागदपत्र आहे. काही देशांच्या पासपोर्टवर तुम्ही अनेक देशांत फिरू शकता. तर काही देशांच्या पासपोर्टवर तुम्हाला जगातील मोजक्याच देशांमध्ये जाता येते. हेनले पासपोर्ट इंडेक्‍स या संस्थेने जाहीर केलेल्या रिपोर्टमध्ये कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात मजबूत आहे किंवा जगभरात त्या देशाच्या पासपोर्टचे किती वजन आहे ? याचा आढावा घेतला आहे.

या आकडेवारीत जाहीर करण्यात आल्यानुसार जपान आणि सिंगापूरचा पासपोर्ट सर्वात मजबूत असून या दोन देशांच्या पासपोर्टवर तुम्ही जगभरातील १८९ देशांमध्ये फिरू शकता. आणि महत्वाचे म्हणजे तेदेखील विना व्हिजा. त्यामुळे या दोन देशांच्या पासपोर्टचा मोठे महत्व आहे. याआधी २०१८ मध्ये जर्मनीच्या पासपोर्टचा सर्वात मजबूत आणि वजनदार घोषित करण्यात आले होते. त्याच यादीमध्ये भारतीय पासपोर्ट ८६ व्या क्रमांकावर असून भारताचा मोबिलिटी स्कोअर ५८ आहे. यामुळे तुम्ही भारतीय पासपोर्टवर जगभरातील ५८ देशांमध्ये विना व्हिजा फिरू शकता.भारताबरोबरच मार्टियाना, साओ टोम आणि प्रिंसिपे हे देशदेखील ८६ व्या क्रमांकावर आहे. या यादीत एकूण १९९ पासपोर्टचा समावेश असून २२७ पर्यटन स्थळांचा देखील समावेश आहे.

दरम्यान, या यादीत यूनायटेड किंगडम, अमेरिका, बेल्जियम, कॅनडा , ग्रीस, आयर्लंड आणि नॉर्वे यांच्यासह आठ देश सहाव्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर डेन्मार्क , इटली आणि लग्‍जमबर्ग हे तिसऱ्या स्थानावर असून फ्रान्स, स्‍पेन आणि स्‍वीडन हे चौथ्या क्रमांकावर आहेत. दरम्यान, इराक आणि अफगाणिस्तान या यादीमध्ये तळाला असून इराकचे नागरिक विना व्हिजा २७ देश तर अफगाणी नागरिक विना व्हिजा २५ देशात फिरू शकतात.

रंगांचा मानवी जीवनावर पडतो सखोल प्रभाव, जाणून घ्या सत्य

तुम्हाला नखे कुरतडण्याची सवय आहे का ? मग हे नक्की वाचा

आता स्वतःहूनच नष्ट होतील ‘कर्करोगाच्या’ पेशी

ही ‘आसने’ करतील कंबर ‘सडपातळ’ करण्यास मदत

वंचित बहुजन आघाडीला खिंडार, लक्ष्मण मानेंनी केले गंभीर आरोप