‘या’ आहेत सर्वाधिक महागड्या वस्तू, किंमत ऐकून व्हाल ‘थक्क’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात अशा अनेक महागड्या वस्तू आहेत ज्यांची किंमत ऐकूनच काही जणांना चक्कर येईल. आम्ही देखील तुम्हाला अशाच काही महागड्या वस्तूंबाबत माहिती देणार आहोत.

कोणत्या आहेत या वस्तू


1) हॅलो किट्टीचे पुतळे
हे पुतळे सर्वात महागडे असून यामधील एका पुतळ्याची किंमत हि 10 लाख 20 हजार 411 असून सर्वात महाग पुतळ्यांमध्ये याची गणना होते. या पुतळ्यांमध्ये स्वारोव्हस्की क्रिस्टल्स भरले असल्याने त्यांची किंमत मोठ्या प्रमाणात वाढते.

2) बेले इपोक डायमंड आणि पन्ना हार
या डायमंड आणि पन्ना हाराची किंमत अमेरिकन चलनामध्ये १.3 दशलक्ष ते १ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी आहे.

3) एसेर गोल्ड मोबाइल फोन
हा मोबाईल कोणत्याही प्रकारचे काम करत नसून या मोबाईलद्वारे ना तुम्ही फोन करू शकता ना दुसरे काही. मात्र या मोबाईलची किंमत ऐकून तुम्हाला चक्कर येईल. या मोबाईलची किंमत हि 41 लाख रुपये असून यामध्ये केवळ सोने आहे.

4) ब्रिटिश गयाना स्टॅम्प
जगातील सर्वात प्रसिद्ध अशा या स्टॅम्पची किंमत देखील मोठी असून 10-20 दशलक्ष डॉलर इतकी याची किंमत आहे.

5) हर्मीस हिरा आणि हिमालयीन निलो मगरी बिर्किन हँडबॅग
या हँडबॅगला 242 हिरे लावण्यात आली असून हिची किंमत देखील काही कोटींच्या घरात आहे.

६) मायकेल जॅक्सनची काळी फेडोरा हॅट
पॉप स्टार मायकल जॅक्सनच्या या टोपीची किंमत देखील मोठी असून 1984 मध्ये हि टोपी तयार करण्यात आली होती. या टोपीची किंमत हि 40000 ते 50000 हजार रुपये इतकी आहे.

आरोग्यविषयक वृत्त –