पुण्यातील दुर्देवी घटना ! चारचाकी विहीरीत पडल्याने आई अन् 2 मुलांचा मृत्यू

वाघोली : पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील अष्टापुर येथे फोर व्हिलर गाडी विहीरीत पडून तीन जणांचा दुर्दैवी रित्या मृत्यू झाला आहे तर एकाची प्रकृती गंभीर आहे.रात्री उशीरा अष्टापुर येथील सचिन कोतवाल हे त्यांच्या पत्नी व दोन मुलासह गाडीतून जात असताना फोर व्हिलर गाडी थेट रस्त्यालगत असलेल्या विहीरीत जावून कोसळल्याने या दुर्दैवी घटनेत पत्नी व दोन मुलांना यात आपला जिव गमवावा लागला आहे.अपघात पत्नी शितल कोतवाल व 9 वर्षीय मुलगी सृष्टि आणि 6 वर्षांचा मुलगा शौर्य यांचा यात मृत्यू झाला असून सचिन कोतवाल यांची प्रकृती गंभीर व चिंताजनक असून त्यांच्या वरती हॉस्पिटल मध्ये सध्या उपचार सुरू आहेत.कार विहीरीत पडून एकाच कुटूंबातील तीन जणांचा दुर्दैवी रित्या मृत्यू झाल्याने अष्टापुर परिसरात शोककळा पसरली असून सर्वांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे..