Pune News : कौतुकास्पद ! माय-लेकी बनल्या जगातील पहिल्या रोझ वाईन क्वीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाईनप्रेमींना आता गुलाबाच्या चवीच्या वाईनचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. पुण्यातील उद्योजिका जयश्री यादव आणि त्यांची मुलगी कश्मिरा यादव-भोसले यांनी गुलाबाच्या पाकळ्यांपासून वाईनची निर्मिती केली आहे. त्यांच्या या संशोधनावर एकस्व अधिकाराची (पेटंट) मोहोर उमटली आहे. फुलापासून वाईन निर्मिती करणाऱ्या या मायलेकी पहिल्या उद्योजिका ठरल्या आहेत. त्यांनी भारतासह 140 देशांत गुलाब वाईनचे पेटंट लॉक केले आहे.

यादव यांनी मागील वीस वर्षापासून गुलकंद, सरबत आणि गुलाबपाणी अशा उत्पादनांचा उद्योग आहे. पन्नास-शंभर किलो कुलकंद उत्पादनापासून सुरुवात केलेला हा व्यवसाय आज टनापर्यंत पोहचला आहे. सध्या त्या टनांमध्ये गुलकंदाचे उत्पादन करत आहेत. सुरुवातीला त्यांनी शेतकऱ्यांकडून गुलाब विकत घेतले. मात्र, आता त्यांनी स्वत:ची गुलाबाची बाग फुलवली आहे. हा व्यवसाय करत असताना त्यांना गुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंद करण्याची कल्पना सुचली. त्यानुसार त्यांनी संशोधनास सुरुवात केली. वाईन तयार करण्यात यश आल्यानंतर त्यांनी पेटंटसाठी प्रयत्न सुरु केले. नुकतेच त्यांच्या गुलाबाच्या वाईनला पेटंट मिळाले असून केंद्राकडून त्यांना पेटंटचे प्रमाणपत्र मिळाले आहे.

गुलाबापासून वाईन तयार करण्यास 2008 मध्ये सुरुवात केली. गुलाबापासून वाईन करण्याचे प्रयोग त्यांनी घरातच सुरु केले. अशा प्रकारची वाईनची चव आजवर चाखली नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. राज्यात फुलांपासून वाईन तयार करण्याचा कोणताही कायदा उत्पादन शुल्काच्या नियमालीत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी त्यांनी तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क मंत्री बानकुळे यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर कायद्यात सुधारणा करुन गुलाबापासून वाईन निर्मिती करण्याची यादव यांना परवानगी मिळाली.

यादव यांनी सांगितले की, आमदार दिलीप मोहिते-पाटील, माधुरी मिसाळ, चंद्रशेखर बावनकुळे यांची खूप मदत झाली. आई वडिलांनी दिलेल्या शिक्षणाचा फायदा मला हा उद्योग उभारण्यात झाला. तीच शिकवण मी मुलींना दिली. मोठी मुलगी ऑस्ट्रेलियात आहे. तर लहान मुलगी मला आता येथे वाईन निर्मितीसाठी मदत करत आहे. माझी मेहनत सार्थकी लागवम्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

चाकणमधील एमआयडीसीमध्ये अद्यावत रिफायनरी उभारली जाणार आहे. यात पाच हजार लिटर क्षमतेच्या तीन टाक्या, तर एक हजार लिटर क्षमतेच्या तीन टाक्या अशा एकूण अठरा हजार लिटर रोझ वाईन दर चार महिन्याला तयार होणार आहे. यासाठी लागणाऱ्या बाटल्या इटली येथून मागवल्याचे यादव यांनी सांगितले.