Panvel News : धक्कादायक ! लग्नाला नकार दिल्यानं शेजारील विधुरानं केली आईसह 18 वर्षांच्या मुलीची हत्या

पनवेल : पोलीसनामा ऑनलाईन – आज (शुक्रवार, दि 19 फेब्रुवारी रोजी) पनवेल तालुक्यातील दापोली गावातून दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. आई आणि मुलीची हत्या करून आरोपी फरार झाला आहे. आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पनवेल शहर पोलीस सध्या फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

सुरेखा वळखडे (आई) आणि सुजाता वळखडे (मुलगी) असं खून झालेल्या मायलेकींची नावं आहेत. सुरेखाचा नवराही या घटनेत जखमी झाला आहे. पनवेलीमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ते पनवेल तालुक्यातील दापोली गावचे रहिवाशी आहेत.

वळखडे यांच्या शेजारी राहणाऱ्या एका इसमानं सकाळी त्यांच्या घरात शिरून सुरेखा आणि सुजाता यांची हत्या केली. यानंतर आरोपी मागच्या खिडकीतून उडी मारून फरार झाला असं समजत आहे.

आरोपीच्या पत्नीचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं होतं. एकटा पडलेल्या आरोपीनं सुरेखा यांच्या 18 वर्षांची मुलगी सुजाता सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. वळखडे कुटुंबानं यासाठी नकार दिला. याचा राग धरून आरोपीनं आज दुहेरी हत्याकांडाचं कृत्य केलं. घटना घडली तेव्हा सुरेखाचा पतीही घरात होता. तोही यात जखमी झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपी हा ढंपर चालक आहे अशी माहिती समजत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड झालं असावं असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.