ST बस आणि मोटारसायकल अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू, दापोलीजवळील घटना

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – एसटी बस आणि दोन मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली असून यात दोन मायलेकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत. रत्नागिरीतील दापोली शहराजवळील वळणे औद्योगिक वसाहतीजवळ (MIDC) हा अपघात झाला.

मीनाक्षी मंगेश बोरजे (वय-45), आकाश मंगेश बोरजे (वय-21) असे मृत्यू झालेल्या मायलेकाचे नाव आहे. तर विलास गोरीवले, निलेश गोरीवले हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. दापोली परिसरात देखील संततधार सुरूच आहे. त्यामुळे निसरड्या रस्त्यावर हा अपघात झाला. यात आई आणि मुलगा जागीच मृत्यूमुखी झाला. दापोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.

तर, दुसऱ्या घटनेत, भरधाव ट्रकने एका पुरोहीताला चिरडल्याची घटना घडली असून पालघर जिल्ह्यातील वाडा- मनोर मार्गावरील पालीनजीक हा भीषण अपघात झाला. अजय कापसे असे या अपघातातील मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर ट्रकचालक ट्रक घेऊन पसार झाला आहे.

दुचाकीवरून वाड्याच्या दिशेने चाललेल्या अजय कापसे यांनी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडले.

वाडा तालुक्यातील पोशेरी येथील आयडियल कॉलेजमधील मंदिरात पूजेसाठी गेलेले कापसे वाड्याच्या दिशेने परतत होते. यावेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. ते ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.