Nashik crime news | दुर्देवी ! दुचाकींच्या धडकेत मायलेकाचा जागीच मृत्यू, नाशिक जिल्ह्यातील घटना

नाशिक (Nashik) : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik crime news |दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या नवीन आडगाव नाक्यालगत समांतर रस्त्यावर सोमवारी (दि. 24) रात्री पावणे आठच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. Nashik crime news |mother and son lost life two wheelers collided road parallel highway nashik

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

अंजनाबाई नाथा खिल्लारे (वय 60) आणि दादाराव नाथा खिल्लारे (वय 40 दोघेही रा. भोगाव, ता. जिंतूर, जि. परभणी ) असे अपघातात ठार झालेल्या मायलेकांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी रोडवरील कलानगर येथील रहिवासी धम्मपाल खिल्लारे हा सोमवारी रात्री पावणे आठच्या सुमारास आई अंजनाबाई व भाऊ दादाराव यांच्यासह दुचाकीवरून नवीन आडगाव नाकामार्गे समांतर रस्त्याने जात होता. त्यावेळी समोरून भरधाव आलेल्या ऍक्टिवा दुचाकीने धडक दिली. त्यात दुचाकीचे चाक तुटल्याने दुचाकी दुभाजकावर जाऊन आदळली आणि अंजनाबाई व दादाराव, चालक धम्मपाल असे तिघे दुचाकीवरून पडले.

अंजनाबाई आणि दादाराव गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. धम्मपालदेखील जखमी झाला आहे. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. धम्मपाल दिंडोरीरोडवर असलेल्या कलानगर म्हाडा बिल्डिंगमध्ये वॉचमन म्हणून नोकरीला आहे. काही दिवसांपूर्वी आई अंजनाबाई आणि भाऊ दादाराव असे दोघेही धम्मपालला भेटण्यासाठी परभणी येथून आले होते. सोमवारी पुन्हा आपल्या मूळ गावी परत जायचे असल्याने मुलगा धम्मपाल दुचाकीवरून नाशिकरोड रेल्वे स्थानकावर त्यांना सोडविण्यासाठी जात होता. त्यावेळी झालेल्या अपघातात धम्पालच्या आई आणि भावाचा मृत्यू झाला.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : mother and son lost life two wheelers collided road parallel highway nashik

हे देखील वाचा

Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हाला काही नको’,
तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

Pune News | पोलीसनामाच्या बातमीचा दणका ! अखेर शिरुरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई

EPFO | बदलणार PF खात्याशी संबंधीत नियम, EPF चे पैसे पाहिजेत तर आजच पूर्ण करा ‘हे’ काम

Pimpri Crime News | ‘बजाज’ मधून निम्म्या किंमतीत गाड्यांचे आमिष पडले साडेसात लाखांना; बजाज कंपनीत अधिकारी असल्याचे सांगून दोघा भावांनी घातला व्यावसायिकाला गंडा