पोटच्या मुलीला आईने 7 जणांकडे पाठवलं ! मग झाली पोलीस कारवाई

बँकॉक : वृत्तसंस्था – आई म्हटले की आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईचा चेहरा आपल्या समोर येतो. मात्र, कधी एका आईने पैशांसाठी आपल्या मुलीची देहविक्री केल्याचे ऐकले नसले. पण असा धक्कादायक प्रकार बँकॉकमध्ये घडला आहे. या सगळ्या प्रकारामुळे सर्वच स्तरातून संतापाची लाट उसळली आहे. बँकॉकमध्ये एका आईने आपल्या मुलीला पैशांसाठी तब्बल 7 पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास सांगितले.

दरम्यान, आता या महिलेला आपल्या मुलीला अनेक पुरुषांसोबत शारीरिक संबध ठेवायला लावल्या प्रकरणी अटक केली आहे. 39 वर्षीय महिलेची 19 वर्षाची मुलगी मानसिकरित्या आजारी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या महिलेने मुलीची परवानीगी न घेता तिचे डेटिंग प्रोफाईल सांभाळत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पहिल्यांदा आपल्या मुलीला पुरूषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगत होती. नंतर त्या पुरुषांना ब्लॅकमेल करत होती. अशा एका प्रकारात या महिलेचा पर्दाफाश झाला. एका पुरुषासोबत या मुलीने लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानंतर महिलेचे बिंग फुटले. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, थायलंडच्या उदोन थानी कोर्टाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर या महिलेला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी तीने अनेक पुरुषांना अशा प्रकारे ब्लॅकमेल केल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत.

गुन्हा करण्याची पद्धत
ही महिला सरकारी कर्मचाऱ्याच्या पोशाखात संबंधित पुरुषाकडे जात होती. त्यानंतर ती त्या पुरुषाला कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देत असे. एका 24 वर्षाच्या सेल्समनने सांगितले की, एका डेटिंग अ‍ॅपवर या महिलेची मुलगी भेटली. त्यानंतर नंबरची देवाणघेवाण केली. दोघेही भेटण्यास तयार झाले. एका रिसॉर्टमध्ये मुलीला भेटल्यानंतर लगेचच ही महिला घरी आली. तिने मुलीशी संबंध असल्याचा आरोप करण्यास सुरुवात करत पैशांची मागणी केली. तिने त्या व्यक्तीकडून सहा लाख रुपये घेतले. अशा प्रकारे तिने अनेकांची फसवणूक केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/