वडील जिमला जाताच आईने मुलीचा खून करून स्वत : केली आत्महत्या

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठाण्यामध्ये एक खळबळजनक घटना घडली असून आईने पोटच्या मुलीचा खून करून स्वत: आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हा प्रकार ठाण्याच्या काळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरी सुमर सोसायटीत घडली आहे. प्रज्ञा पारकर आणि श्रृती पारकर असी आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच कळवा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रृतीचे वडील प्रशांत पारकर आज सकाळी जिमला गेले होते. ते घरी परत आल्यावर घरात प्रवेश करताच त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली श्रृती दिसली. तर त्यांची पत्नी प्रज्ञाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पाहून त्यांना मानसिक धक्का बसला. या घटनेची माहिती प्रशांत यांनी कळवा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्रज्ञा पारकर यांनी आपल्या १७ वर्षाच्या श्रृतीचा खून का केला आणि स्वत: आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान या घटनेने कळव्यासह ठाण्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्रृतीचे वडील प्रशांत पारकर यांची मानसिक स्थिती योग्य नसल्याने त्यांच्याकडे चौकशी करण्यात आलेली नाही. मानसिक धक्क्यातून बाहेर आल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी करण्यात येईल. चौकशी नंतरच खरा प्रकार उघडकीस येईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like