‘या’ कारणामुळं ‘मदर डेअरी’नं गायीच्या दूधाच्या दरात केली 2 रूपयांनी वाढ, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीतील प्रमुख दूध उत्पादक कंपनी मदर डेअरीने दिल्लीमध्ये आपल्या गायीच्या दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ केली असून आता गायीचे दूध 44 रुपये लिटर झाले आहे. आजपासून नवीन दर लागू झाले असून शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या दुधाचे दर वाढवल्याने आम्हाला या दुधाचे देखील दर वाढवायला लागल्याचे सांगितले. मात्र कंपनीने इतर कोणत्याही दुधाच्या दरांमध्ये वाढ केली नसून फक्त गाईच्या दरांमध्येच वाढ करण्यात आली आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून कंपनीला कच्च्या दुधाच्या खरेदीसाठी लिटरमागे दोन ते तीन रुपये अधिक द्यावे लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

यामुळे वाढवले दर
आजपासुन अर्धा लिटर गायीचे दूध हे 23 रुपयांना मिळणार असून 1 लिटर दूध हे 44 रुपयांना मिळणार आहे. त्याचबरोबर मदर डेअरीच्या या निर्णयानंतर अमूल आणि पराग देखील आपल्या दुधाच्या दरांमध्ये वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर मागील काही महिन्यांपासून कंपनीला कच्च्या दुधाच्या खरेदीसाठी लिटरमागे दोन ते तीन रुपये अधिक द्यावे लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, मदर डेअरी दिल्लीतील एनसीआरमध्ये जवळपास 30 लाख लिटर दुधाची रोज विक्री करते. यामध्ये 8 लाख लिटर इतके गायीचे दूध असते. यामध्ये अर्ध्या लिटरच्या पिवशीचे दर जरी 23 रुपये करण्यात आले असले तरी 1 लिटरच्या पिशवीचे दर मात्र 44 रुपयेच ठेवण्यात आले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –