मदर डेअरीने वाढवले दुधाचे भाव, रविवारपासून प्रतिलिटर ३ रुपयांनी होणार महाग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मदर डेअरीने दुधाची किंमत प्रति लिटर ३ रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी दिल्ली-एनसीआर प्रदेशातही मदर डेअरीच्या दुधाच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात येणार आहे. दिल्ली-एनसीआर प्रदेशात मदर डेअरी दररोज सुमारे ३० लाख लिटर दुध सप्लाय करते. यापैकी ८ लाख लिटर दूध हे गाईचे असते.

सप्टेंबर महिन्यातच मदर डेअरीने दुधाचे दर प्रतिलिटर २ रुपयांनी वाढविले होते. दरम्यान, एक लिटर गायीच्या दुधाच्या पॅकवर कोणतीही वाढ झाली नाही. पण, अर्ध्या लिटरच्या पॅकमध्ये १ रुपयांनी वाढ करण्यात आली. सध्या दिल्ली-एनसीआरमध्ये मदर डेअरीचे एक लिटर फुल क्रीम दुध ५४ रुपयांना मिळते. जे रविवारपासून ५७ रुपये होणार आहे.

मदर डेअरीने टोकेन मिल्कच्या किंमतीत दोन रुपयांची वाढ केली आहे, त्यानंतर ती प्रतिलिटर ४२ रुपये झाली आहे. त्याचबरोबर पूर्ण मलई दुधाच्या किंमतीतही अशीच वाढ करण्यात आली असून, प्रति लिटर ५५ रुपये दराने विकले जाणार आहे. अर्ध्या लिटर पूर्ण क्रीम दुधाची किंमत २७ रुपयांवरून २८ रुपयांवर गेली आहे.

टोन्ड आणि डबल टोन्डचे दरही वाढले :
टोन्ड दुधाच्या किंमतीत प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता याची किंमत ४५ रुपये प्रतिलिटर झाली आहे. त्याचवेळी दुहेरी टोन्ड दुधाची किंमत ३९ रुपयांवर गेली आहे, जी अर्ध्या लिटरमागे ३६ रुपये होती. त्याचबरोबर गायीच्या दुधाची किंमतही प्रति लिटर ३ रुपयांनी वाढली आहे, त्यानंतर ती प्रति लिटर ४७ रुपये झाली आहे.

का वाढविल्या किमती :
मदर डेअरीने आपल्या निवेदनात म्हटले की, देशभरातील अनेक राज्यात दुधाचे उत्पादन कमी झाले आहे. यातील सर्वात मोठे कारण म्हणजे लांबलेला मान्सूम, त्याचबरोबर पर्यावरणालाही दुष्परिणाम सहन करावा लागला आहे, त्यानंतर चाराच्या किंमतीही वाढल्या आहेत. यामुळे दूध उत्पादकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like