प्लास्टिकच्या विरूध्द ‘या’ डेअरीचं मोठं पाऊल, टोकनच्या दूधावर प्रतिलिटर 4 रूपयांची सुट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्लास्टिकविरोधात जोरदार मोहीम राबविल्याने आणि जागतिक पातळीवरही तशी घोषणा केल्याने देशातील संस्थां/कंपन्यांनेदेखील याकामी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. मदर डेअरीने यासंदर्भात सांगितले की, ‘आम्ही प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्या हेतूने, टोकन दुध पॅकेज केलेल्या दुधापेक्षा चार रुपये प्रति लिटर कमी दराने विकत आहोत.’ सध्या मदर डेअरी आपल्या ९०० बुथच्या मजबूत नेटवर्कद्वारे सरासरी ६ लाख लिटर दुधाची विक्री करते.

होम डिलिव्हरी देखील सुरू होणार :
टोकन दुधाच्या विक्रीला चालना देण्यासाठी आणि प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काही अतिरिक्त पावले मदर डेअरीने उचलली आहेत. यातीलच एक पाऊल म्हणजे दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, फरीदाबाद आणि गाझियाबाद येथील रहिवाशांना प्रत्येक घरात घरपोच दुधाचा पुरवठा करण्याचा निर्णय डेअरीने घेतला आहे.

पॅकेज केलेल्या दुधाच्या तुलनेत टोकन दूध चार रुपये प्रति लिटर दराने विक्री करण्याव्यतिरिक्त, ग्राहकांना किरकोळ विक्री दुकानात वेंडिंग मशीनद्वारे अधिक चांगल्या सुविधा देखील देण्यात येणार आहेत. टोकन दुधाची मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीने आपली क्षमता वाढवून दररोज १० लाख लिटर केली आहे. आता मोठ्या संख्येने लोकांना व्हेंडिंग मशीनचा फायदा घेतील, अशा प्रकारे या रोख प्रोत्साहनाचा वर्षाकाठी १४० कोटींचा फायदा होईल.

१९७४ मध्ये मदर डेअरीने टोकन दुधाची केली सुरुवात :
१९७४ मध्ये मदर डेअरीने टोकन दुधाची सुरवात केली. त्यापासून प्लास्टिक उत्पादनात ४०,००० मेट्रिक टनची बचत झाली आहे. ही पहिली दूध वितरण प्रणाली आहे. जी प्रभावी कोल्ड साखळीद्वारे उत्पादकाकडून ग्राहकांना दर्जेदार दूध पुरवते. आज मदर डेअरी ही एकमेव ऑपरेटिंग डेअरी संस्था आहे, जी प्लास्टिक पॅकेजिंगशिवाय मोठ्या प्रमाणात पर्यावरण पूरक आणि अनुकूल पद्धतीने दूध पुरवते. मदर डेअरीचे टोकन दूध म्हणजे भारताचे असे पहिले दूध आहे जे १९८२ पासून व्हिटॅमिन ए ने फोर्टोफाय केले आणि नंतर व्हिटॅमिन डी ने फोर्टिफाय केले आहे.

Visit : Policenama.com