सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याने आई-वडिलांनी उच्चशिक्षित मुलीची केली हत्या

सोलापूर : पाेलीसनामा ऑनलाईन

मंगळेढा तालुक्यात आॅनर किलिंगची धक्कादायक घटना घडली आहे. सालगड्याच्या मुलासोबत प्रमविवाह केल्यामुळे सावत्र आई व वडिलांनीच आपल्या 22 वर्षीय बी. ए. एम. एस. चे शिक्षण घेणाऱ्या मुलीची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करुन पुरावा नष्ट करण्यात आला आहे. याप्रकरणी वडिल धोंडीबा बिराजदार व सावत्र आई श्रीदेवी विठ्ठल बिराजदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलीसांनी अटक केली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a5d5cc93-c932-11e8-8725-b725a0decd90′]
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील मयत अनुराधा विठ्ठल बिराजदार(वय 22 वर्षे) हिने सालगड्याच्या मुलाशी प्रेमविवाह केला होता. सदर मयत ही कर्नाटकातील सिंदगी येथे बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेत आहे. तेथे जावून त्या मुलाने प्रेमविवाह केला होता. प्रेमविवाहाचे वृत्त वडिल तथा आरोपी विठ्ठल बिराजदार यास समजल्यानंतर सिंदगी येथे जावून मयतास तात्काळ घेवून आले व दि.2 ऑक्टोबर रोजी पहाटे 1.30 वा.बोराळे येथील फिर्यादी बाळासाहेब म्हमाणे यांच्याकडे सोडून गेले.
प्रेमविवाहाच्या बदनामीमुळे मयताचे वडिल संतापले व त्यांनी फिर्यादीस मुलीने सालगडी असलेल्या मुलाबरोबर प्रेमविवाह केल्याचे सांगून तिला तेथे सोडून गेले. यावेळी जाताना आरोपीने माझी बदनामी झाली आहे, तिला आता जिवंत ठेवणार नाही असे म्हणून आरोपी निघून गेला. दि.4 रोजी दुपारी 1.30 वा.च्या दरम्यान आरोपीने बोराळे येथे येवून अनुराधाची तोंडी परीक्षा राहिली आहे. तिला घेवून जातो असे सांगून इनोव्हा गाडीतून घेवून गेला व दि.5 ऑक्टोबर रोजी सलगर येथे अनुराधा हिला दोघा पती-पत्नींनी जिवे ठार मारून शेतात पहाटे 4 वा.अंत्यविधी उरकला.

[amazon_link asins=’B0796QP4LS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b05a84e7-c932-11e8-8651-8931032bbee0′]

अनुराधाला अाई-वडीलांपासुन धाेका असल्याचे मृत्यूपुर्वी समजले हाेते. त्यामुळे तिने मृत्यूपूर्वी दोन चिठ्या लिहून ठेवल्या होत्या. त्यामध्ये वडिल व सावत्र आई यांच्यापासून माझ्या जिवीताला धोका आहे, ते मला मानसिक त्रास देतात, मला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत हे माझ्या लक्षात आले असून माझा मृत्यू झाल्यास त्यांना जबाबदार धरण्यात यावे असे चिठ्ठीत नमुद करण्यात आल्याचे दिलेल्या फिर्यादीत बाळासाहेब म्हमाणे यांनी म्हटले आहे.