एका याचिकाकर्ता आईमुळे लाखो नोकरदार महिलांना ‘दिलासा’, कॅटकडून ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डॉ. फरहीन बेगम नुकतीच आई झाली होती आणि आई होण्याचा सर्व त्रास सहन करत होती. याच त्रासाला कंटाळून त्यांनी केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण म्हणजे कॅटकडे याचिका दाखल केली होती.

याचिकेमध्ये डॉ. फरहीन यांनी सांगितले की, त्या दिल्लीतील पाच OPD चालवतात. सकाळी कार्यालय, नंतर फिल्ड वर्क आणि पुन्हा काम करून संध्याकाळी ऑफिसला उपस्थिती लावण्यासाठी त्यांना जावे लागते. त्यांच्या मुलाला अजून एक वर्षदेखील पूर्ण झालेले नव्हते. तिला तिच्या मुलासाठी कसलाही वेळ देता येत नव्हता. त्यामुळे ती खूप परेशान झाली. त्यांनी जेव्हा फिल्डवरून घरी जाण्याची परवानगी मागितली तेव्हा त्यांना परवानगी नाकारण्यात आली. या बदल्यात त्यांचे पुढील महिन्यातील पगार रोखण्यात आला.

यानंतर त्यांनी याचिका दाखल करून घरी जाण्याची परवानगी मागितली. कॅटने या याचिकेवर निर्णय देताना सांगितले की लहान मुलांची आई आता फिल्डवरून थेट घरी जाऊ शकते. त्यांना कार्यालात जाऊन हजेरी लावण्याची गरज नाही. मातृत्व लाभ संशोधन अधिनियम २०१७ चे उपकलम ३ बी (५) चा संदर्भ कॅटने दिला. कॅटने सांगितले की, जर महिलांना कार्यालयात येण्याची सक्ती केली तर या कायद्याचा उद्देश यशस्वी होणार नाही.

कॅट सदस्य बिष्णोई यांनी हा निर्णय देताना सांगितले की, कार्यालया बाहेरील काम संपल्यानंतर महिलांना बायोमेट्रिक हजेरी लावण्यासाठी दबाव नाही टाकला जाऊ शकत. याबरोबरच त्यांनी डॉ. फरहीन यांचा रोखलेला पगार देण्याचा आदेश देखील दिला आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे

मोदी म्हणतायेत योगा करेल ” गरिबी दूर “

२१ जून जागतिक योग दिन : ” हे ” आहेत भारतातील सर्वात मोठे योगगुरू

शरीराचा गंध सांगेल तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलु