आईला न सांभाळणारे तिघे अटकेत

भोपाळ : वृत्तसंस्था – मुले Children म्हतारपणाची काठी असतात हा विश्वास आज प्रत्येक आई-वडिलांमध्ये आहे. ती वृद्धापकाळातील आधार मानले जातात. मात्र, आज मुलांना आई-वडील ओझे वाटू लागले आहेत. वृद्ध आई-वडलांचा सांभाळ करण्यास अनेक मुले तयार नसतात. असाच एक धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशमध्ये समोर आला आहे. पाच मुले Children असूनही एका वृद्ध आईवर दारोदारी भटकण्याची वेळ आली आहे. लहानाचे मोठे केलेल्या पाचही मुलांनी वृद्धापकाळात आधार देण्यास नकार दिला. अखेर या वृद्ध आईला अखेरीस पोलीस ठाणे गाठावे लागले.

मध्य प्रदेशमधील राजागड येथील देवाखेडी गावातील रहिवासी असलेल्या रामकुंवर बाई ह्या पतीच्या निधनानंतर एकट्याच राहत आहेत. त्यांचे पाच मुले आहेत. मात्र त्यांचे विवाह झाल्यानंतर हे पाचही मुले त्यांच्या त्यांच्या पत्नींसह वेगळे राहू लागले. मात्र एकट्या राहिलेल्या वृद्ध आईचा सांभाळ करण्यासाठी कुणीही पुढे येईना. अखेर मदतीसाठी लाचार झालेल्या या वृद्ध मातेने मदतीसाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर एसपी प्रदीप शर्मा यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलिसांच्या माध्यमातून पाचही मुलांना समज दिली.

दरम्यान, तरीही वृद्ध आईला आधार देण्यास पाच मुलांमधील कुणीही तयार होईनात. अखेरीस पोलिसांनी पाचही मुलांविरोधात ज्येष्ठ नागरिक देखभाल अधिनियम २४ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पाचपैकी राजेंद्र सिंह, हिंमत सिंह, आणि रमेश सिंह या तीन मुलांवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. अन्य दोन मुलांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Also Read This : 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’

Pune : भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्‍या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी

रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, म्हणाले – ‘राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत’

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभ मिळणार