आईनंच पोटच्या मुलीला परपुरूषासोबत एका खोलीत डांबलं, पुढं ‘असं’ केलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते असा आपण आजवर ऐकत आलो होतो मात्र ही घटना समजल्यावर तुमचाही विश्वास उडेल. पंजाब मधील अमृतसर येथील ही घटना आहे, एका मुलीच्या आईने तिने केवळ सहा हजार रुपयांसाठी दुसऱ्या व्यक्ती सोबत खोलीत कोंडून घेतले आणि त्या व्यक्तीला तिच्याशी संभोग करण्याची परवानगी दिली.

मुलीने सुरवातीला याचा जोरदार विरोध केला मात्र त्या व्यक्तीने जबरदस्तीने संभोग करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर त्या मुलीने शेजाऱ्यांच्या मदतीने जवळील पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आपल्या आई विरोधात तक्रार केली. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आपली आई घरी देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याचे या मुलीने म्हटले आहे.

आईच्या प्रियकराने तिला सहा हजार रुपये देत तिच्या मुलीसोबत रात्र घालवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आईने तिला त्या नराधमासोबत खोलीत कोंडून घेतल्याचे सांगितले. मुलीने पोलिसांत तक्रार देताच पोलिसांनी कारवाई करत मुलीच्या आईला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.

आरोग्यविषयक वृत्त