आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी थेट कोबरासोबत भिडली कोंबडी (व्हिडीओ)

0
97

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर कधी-कधी असे व्हिडिओ वायरल होतात, जे पाहून अंगावर शहारे येतात. असाचा एक व्हिडिओ वायरल होत आहे, ज्यामध्ये एक कोंबडी तिच्या पिलांच्या जवळ येणार्‍या एका भयंकर कोब्रा सापाशी लढताना दिसत आहे.

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, जेव्हा एक आई मुलांना वाचवण्यासाठी लढते, तेव्हा ही लढाई शाही होते. धाडसी आई एका कोब्राशी लढून आपल्या मुलांना वाचवते.

या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, एका छोट्या खोलीत कोंबडीसोबत तिची अनेक पिले आहेत. कोंबडीच्या पिलांवर हल्ला करण्यासाठी कोब्रा जसा जवळ येतो, तेव्हा कोंबडी त्याच्यावर रागाने तुटून पडते. यावेळी कोब्रा तिच्यावर फणा काढून हल्ला करतो, परंतु, ती एक-एक करून पिलांना खोलीच्या बाहेर काढते.

कोंबडीचे एक पिलू खोलीच्या एका कोपर्‍यात राहून जाते. यावेळी त्याच्यासाठी ती पुन्हा कोब्राशी लढते, आणि शेवटी त्यालाही खोलीच्या बाहेर आणते. ती त्या सापाशी तोपर्यंत लढते, जोपर्यंत तिची सर्व पिले सुरक्षित ठिकाणी ती सोडत नाही.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. लोक कोंबडीच्या धाडसाचे कौतूक करत आहेत.