… म्हणून आईनं मुलीला चक्क 2 दिवस ठेवलं उपाशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तशी ती केवळ १२ वर्षाची. आई वडिल मुलांना रागवितात. वेळप्रसंगी मारतात. पण काही वेळाने ते आपल्या मुलामुलीला जवळ घेऊन प्रेमही करतात. पण, ही आई मात्र, खूपच कठोर निघाली. तिने आपल्या बहिणीच्या संगतीने सख्या मुलीला उलथन्याने हातावर मारहाण केली. शिवीगाळ केली. इतकेच नाही तर तिला चक्क दोन दिवस उपाशी ठेवले. असा काय मोठा अपराध केला होता तिने. ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

ती १२ वर्षाची मुलगी इतकेच म्हणाली की मला पप्पाकडे जायचे आहे. बस आईचा पारा चढला. त्याला साथ मिळाली मुलीच्या मावशीची म्हणजेच आईच्या बहिणीची.

खडकी पोलिसांनी आई व मावशीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही महिला भवानी पेठेतील हरकानगर येथे पत्नी, तीन मुले व सासुसह राहत होती. पतीपत्नीमध्ये भांडण झाल्याने ती आपल्या १२ वर्षाची मुलीला व आणखी दोन लहान मुलांना घेऊन बोपोडीतील आपल्या बहिणीकडे रहायला आली. दिवसभर मुले राहिली. सायंकाळी मात्र १२ वर्षाच्या मोठ्या मुलीने मला पप्पाकडे जायचे आहे असे म्हणाली. मात्र, सकाळी पतीबरोबर झालेल्या भांडणाचा राग अद्याप तिच्या आईच्या मनात असल्याने तिने मोठ्या मुलीला उलथण्याने हातावर मारहाण केली. तिचा राग इतका होता की, तिने या मुलीला आंघोळीला पाणी दिले नाही की, दोन दिवस जेवायला दिले नाही. तिच्या घरी ती राहायला आली. तिनेही आपल्या भाचीला जेवायला दिले नाही.

दोन दिवसांनी 20 नोव्हेंबरला मुलीची आजी त्यांना भेटायला गेली. तेव्हा हा सर्व प्रकार तिला समजला. त्यानंतर आता तिने खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली असून त्यावरुन पोलिसांनी बाल न्याय अधिकार ७५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/