संतापजनक ! साध्वीवर चोघांकडून ‘सामुहिक’ बलात्कार

पाटणा : वृत्त संस्था – आई आजारी असल्याचे सांगून एका साध्वीला गावी नेण्याचा बहाणा करुन चार जणांनी वाटेत साध्वीवर सामुहिक बलात्कार करण्याचा प्रकार समोर आला आहे. बिहारमधील शेखपुरा जिल्ह्यातील अरियरी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील फुलचोड गावाजवळ हा प्रकार घडला. पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, साध्वीवर सामुहिक बलात्कार करणारे चार आरोपींपैकी दोघे जण उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील एका गावात राहणारे आहेत. पिडित साध्वी याच गावची राहणारी आहे. नवादा जिल्ह्यातील पर्यटक स्थळ ककोलत येथील आश्रमात आपल्या सहकाऱ्यांसमवेत राहते. त्यांच्या गावातील दोघे जण व अन्य दोघे रविवारी त्यांच्या आश्रमात पोहचले.

त्यांनी त्यांची आई आजारी असल्याचे सांगितले.चौघांनी एक वाहनातून साध्वीला तिच्या गावी घेऊन जात होते. वाटेत त्यांनी फुलचोड गावाजवळ तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Visit : Policenama.com