‘हनीमुन’ला जाण्यापुर्वीच सासूनं सुनेला नेलं बाथरूमध्ये, तपासलं ‘कौमार्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जुन्या विचारांच्या एका परिवाराने बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग (BE) पास सुनेसोबत एक विचित्र प्रकार केला आहे. सासूने आपल्या सुनेची हनीमूनच्या आधी व्हर्जिनिटी चेक केली आहे. त्याचवेळी काही वेळानंतर तिच्या नवऱ्याच्या मोठ्या भावाने तिच्यावर बलात्कार केला. ही लज्जास्पद घटना मध्यप्रदेशच्या इंदूर येथील आहे.

इंदूरच्या द्वारकापुरी पोलीस ठाण्यात या धक्कादायक घटनेची नोंद झाली असून बीई पास असलेल्या एका सुनेने आरोप केला आहे की, साडेतीन वर्षांपूर्वी तिच्या सासूने तिच्यासोबत हनीमूनच्या वेळेस व्हर्जिनिटी तपासण्यासाठी अश्लील कृत्य केले होते. तर नवऱ्याच्या मोठ्या भावाने तिच्यासोबत बलात्कार केला होता. या घटनेमुळे ती अडीच वर्षे आपल्या माहेरीच राहिली. काही काळापूर्वी तिने पतीविरूद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा देखील दाखल केला होता.

या महिलेच्या तक्रारीवरून तिचे सासू, सासरे, पती आणि नवऱ्याचा मोठा भाऊ यांच्यावर बलात्कार आणि हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना अटक करुन तुरूंगात पाठविण्यात आले आहे.

पीडित महिलेने सांगितले की तिचे लग्न मे २०१७ मध्ये झाले होते. हनीमूनच्या दिवशी सासू, नणंद, सासरा, पती आणि जेठ आले. सासू तिला बाथरूममध्ये घेऊन जाऊ लागली आणि म्हणाली की आम्हाला तुझी व्हर्जिनिटी तपासायची आहे. जेव्हा महिलेने याचा विरोध केला तेव्हा तिच्या नवऱ्याने रागात सांगितले की माझे कुटुंबीय हे जुन्या विचारांचे आहे, त्यामुळे असे करावे लागेल.

काही दिवसांनी तिच्या नवऱ्याचा मोठा भाऊ तिच्याकडे वाईट नजरेने बघू लागला. एके दिवशी संधी मिळाल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा महिलेने ही घटना तिच्या पती आणि सासूला सांगितली तेव्हा त्यांनी त्याकडे चक्क दुर्लक्ष केले. काही दिवसांनंतर पतीने तिला बसमध्ये बसवून माहेरी पाठवले. ही महिला अडीच वर्षे आपल्या माहेरीच राहिली. दरम्यान आता तिने फिर्याद नोंदवली आहे.