धक्कादायक ! सासुनं नातवाची ‘उलटी’ साफ नाही केली, सूनेनं ‘सपासप’ वार करून तिला ‘संपवलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नातवाने केलेली उलटी साफ केली नाही म्हणून सुनेने आपल्या 62 वर्षीय सासूचा चाकूने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईतील पायधुनी परिसरात घडली आहे. आमरीन इस्माईल कोळसावाला असे खून करणाऱ्या आरोपी सुनेचे नाव असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. तर सुमय्या अफजल कोळसावाला असे मृत्यू झालेल्या सासूचे नाव आहे. हा प्रकार रविवारी (दि.३) दुपारी दोन ते चारच्या सुमारास पायधुनी येथील कोळसा स्ट्रीट, रॅपीड हाईट्स येथे घडला.

मिळेलेल्या माहितीनुसार, सुमय्या कोळसावाला या त्यांच्या कुटुंबासमवेत रॅपीड हाईट्स या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 501 मध्ये राहतात. त्यांच्यासोबत मुलगा इस्माईल, सून आमरीन आणि सात वर्षाचा नातू राहतो. सुमय्या यांचे वयोवृद्ध असल्याने त्या घरामध्ये नातवाचा सांभाळ करीत होत्या. रवीवारी दुपारी दोनच्या सुमारास नातवाने घरामध्ये उलटी केली होती. आरोपी अमरीनने मृत सुमय्या यांना नातवाची उलटी साफ करण्यास सांगितले. सुमय्या यांनी उलटी काढण्यास नकार दिला. यावरुन दोघीमध्ये वाद झाले.

याच वादातून अमरीन हिने हॉलमधील चाकूने सुमय्या यांच्यावर सपासप वार केले. अमरीन हिने सुमय्या यांच्या पाठीत चाकू भोकसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. हा प्रकार स्थानिक रहिवाश्यांच्या लक्षात येताच त्यांनी सुमय्या यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पायधुनी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करून आरोपी आमरीनला अटक केली.

Visit : Policenama.com