माता न तू वैरिणी ! ३ री मुलगीच झाली, १० दिवसांच्या चिमुकलीचा आईनेच गळा दाबून केला खून

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – एकीकडे बेटी बचाओ चा नारा शासन देत असले तर स्त्रीभ्रूण हत्या थांबत नाहीत. बेटी बचाओसाठी समाजात जनजागृती सुरु आहे. तरीही मुलाचा अट्टाहास अजूनही समाजात शिल्लक आहे. नाशिक जिल्ह्यात खळबळजनक प्रकार समोर आला आहे. तिसरी मुलगी झाल्याने आईनेच १० दिवसांच्या मुलीचा गळा दाबून खून केला, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार नाशिकच्या आडगाव परिसरात समोर आला आहे. याप्रकऱणी मातेवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनुजा काळे या महिलेविरोधात तिच्या पती बाबासाहेब काळेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनुजा काळे हिला याआधी २ मुली आहेत. तिने तिसऱ्या मुलीला एका खासगी रुग्णालयात जन्म दिला. तिसरीही मुलगीच झाल्याने तिने ३१ मे रोजी १० दिवसाच्या मुलीच्या डोक्यात कशानेतरी मारून तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिच्या पतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. जिल्हा रुग्णालयात चिमुलकलीचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.

Loading...
You might also like