प्रेमात अडथळा : प्रियकराच्या मदतीने आईनेच काढला मुलाचा काटा

रोहतक : वृत्तसंस्था – प्रेमसंबंधांमध्ये अडसर होतो म्हणून आईने प्रियकराच्या मदतीने सख्ख्या मुलाचा सुपारी देऊन खून केला आहे. सदर घटना हरियाणातील जझ्झर जिल्ह्यात घडली असून पोलिसांनी या प्रकरणी आई, तिचा प्रियकर आणि इतर दोघांना अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव प्रमोद (वय २३) असून तो गुरुग्राममध्ये बाऊन्सर म्हणून काम करत होता. विशेष म्हणजे प्रमोदच्या आईचे त्याच्या समवयीन मित्राबरोबरच प्रेमसंबंध होते.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद हा आपल्या विधवा आई मीनादेवी सोबत राहत होता. गुरुग्राममध्ये बाऊन्सर म्हणून काम करत असताना त्याची प्रदीप या तरुणाशी मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर प्रदिप प्रमोदच्या घरी जाऊ लागला. त्याच दरम्यान प्रमोदच्या आईचे आणि प्रदीपचे सूत जुळले. या प्रकरणाचा संशय प्रमोदला आला. त्यामुळे पुन्हा आपल्या घरी येऊ नको असे प्रमोदने प्रदीपला बजावले.

प्रेमसंबंधात मुलाचा अडथळा आल्यामुळे मीना देवी आणि प्रियकर प्रमोदने त्याच्या खुनाचा कट रचला. त्यानुसार प्रदीपने आपले मित्र सौरभ आणि भिवाणी या दोघांना सुपारी दिली. सौरभ आणि भिवाणी यांनी प्रमोदला गोळी घालून ठार केले. पोलिसांनी जेव्हा सौरभ आणि भिवाणीला बेकायदेशीर बंदूक बाळगल्याप्रकरणी अटक केली तेव्हा ही घटना समोर आली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

ह्याही बातम्या वाचा –

भारतीय संघाची पुलवामातील शहिदांना अनोखी ‘आदरांजली’

पवारांचं जाहीर सभेतच वोटिंग … म्हणले शिरुर लोकसभेचा उमेदवार कोण हवा ?

मुलायमसिंह यांच्यासह परिवारातील अन्य दोघांच्या लोकसभा उमेदवारीची घोषणा

शिल्पा शेट्टीचे जबरदस्तीने चुंबन घेणारा हॉलिवूडचा ‘हा’ दिग्गज अभिनेता वयाच्या ६९ व्या वर्षी बनला बाबा