दोन दिवसांच्या चिमुरडीला रुग्णालयाबाहेर सोडून आई फरार

औरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाईन

जन्मदात्या आईने दोन दिवसांच्या चिमुरडीला रात्रीच्या वेळी रुग्णालयाबाहेर सोडून पळून गेल्याची घटना औरंगाबदच्या घाटी रुग्णालय परिसरात घडली आहे.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’66838aab-b8b8-11e8-b93a-5f41098fc28c’]

घाटी रुग्णालयाच्या प्रांगणात ही चिमुरडी सुरक्षारक्षक आणि नागरिकांना आढळून आली. याबाबत शोधाशोध केली असता चिमुरडीला तिची आई तिथे सोडून गेली असल्याची माहिती समोर येत आहे.  यानंतर तातडीने या बाळावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. सध्या बाळाची तब्येत ठीक आहे. पोलिसांनी बाळाच्या आईचा तपास सुरू  केला आहे. यासाठी घाटीतील सीसीटीव्हींचे फुटेज तपासण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

पुणे : पोलीस असल्याचा बहाण्याने लुटणारा सराईत चोरटा जाळ्यात